कुरुकली येथे अपघातात दोन महाविद्यालयीन तरूणी ठार

कुरुकली येथे अपघातात दोन महाविद्यालयीन तरूणी ठार

राशिवडे बुद्रुक - कुरुकली (ता. करवीर) येथे आज दुपारी डंपर व दूचीकीच्या अपघातात येथील भोगावती महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थीनी जागीच ठार झाल्या तर एक युवक जखमी झाला. अक्षता आनंदा चौगले ( वय 22 रा. बाचणी ता. करवीर) व विजया शिवाजी पाटील ( वय 22 रा. म्हालसवडे ता. करवीर ) अशी त्यांची नावं असून प्रफुल्ल आनंदा पाटील ( वय 23 रा. गुडाळ ता. राधानगरी ) हा गंभीर जखमी झाला. भर चौकात झालेल्या या अपघातामुळे मोठा कल्लोळ माजला. 

या दोन्ही मुली भोगावती महाविद्यालयामध्ये शास्त्र विभागात शिकत होत्या. विजया जीवशास्त्र तर अक्षता ही रसायनशास्त्रच्या विद्यार्थीनी होत. सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातून शिकणाऱ्या या मुली आज सकाळी तास केल्यानंतर मधल्या सुट्टीमध्ये त्या कुरुकली येथील आपल्या नातेवाईकांकडे चहाला गेल्या होत्या. तिथून त्या पुन्हा कॉलेजमध्ये प्रात्यक्षिकाच्या तासासाठी प्रफुल्ल सोबत दुचाकीवरून  जात होते. महाविद्यालयाकडे जाण्यासाठी येथील कोल्हापूर- राधानगरी हा राज्यमार्ग ओलांडून जावे लागते. येथे मोठा चौक आहे. या चौकात येताच कोल्हापूरहून राधानगरीकडे जाणाऱ्या सिमेंटकॉंक्रीटच्या डंपरला त्यांची जोरदार धडक झाली. डंपरच्या आडवी गेलेली दुचाकी थेट दोन्ही चाकांच्या मध्ये अडकल्याने मागे बसलेल्यां दोन मुलींपैकी अक्षता ही पुढील चाकाच सापडली तर विजया ही रस्त्यावर आपटली. प्रफुल्लचे पाय डंपरच्या चाकाखाली गेल्याने तो जखमी अवस्थेत बेशुध्द झाला. यामध्ये अक्षता जागीच ठार झाली, तर विजया सीपीआरमध्ये उपचारा दरम्यान मृत झाली. प्रफुल्लवर उपचार सुरु आहेत. दुपारी अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com