आरामबसला लागलेल्या आगीत दोघेजण ठार

आरामबसला लागलेल्या आगीत दोघेजण ठार

कोल्हापूरः गोव्याहून मुबंईला निघालेली आराम बस क्र युपी 62 एटी 6362 ने गगनबावड्याजवळ पेट घेतला. या अपघातात दोघेजण ठार झाले. बंटीराज भट ( वय 20 रा. भोपाळ) व मदन भट (वय 25, बैद्यवाडी हडपसर पुणे) अशी मृतांची नावे आहेत.  

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी. मुंबईला जाणारी आरामबसने कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील लेंगे गावाच्या मारूती मंदीराजवळ पहाटे तीनच्या सुमारास अचानक पेट घेतला. आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने पटापट सर्वांना खाली उतरण्यास सांगितले. झोपेत असलेले प्रवाशांना अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे काहीच सुचले नाही. बाहेर पडण्यासाठी दिसेल त्यावाटेने ते बाहेर पडत होते. यात अनेक प्रवाशी किरकोळ जखमी झाले. काही वेळातच लागलेली आग पूर्ण गाडीभर पसरली. तातडीने पोलिस व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. पण गाडीत धूर असल्याने व बाहेर पडण्यास न आल्याने दोन प्रवासी गाडीतच अडकले. यात ते जळून ठार झाले. बंटीराज भट ( वय 20 रा. भोपाळ) व मदन भट (वय 25, बैद्यवाडी हडपसर पुणे) अशी मृतांची नावे आहेत. ते व त्यांचे अन्य चार साथीदार ढोलवादनासाठी गोव्याला गेले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com