दोन हेल्मेट खरेदीचा आग्रह धरा - अशोक धुमाळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

कोल्हापूर - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दुचाकीच्या विक्रीसोबतच ग्राहकाला दोन हेल्मेट खरेदीचा आग्रह वितरकांनी धरावा. हेल्मेट खरेदीची पावती असल्याशिवाय दुचाकीचे पासिंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी आज वितरकांना दिल्या. 

दुचाकीधारकांना शहरात हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्याचे प्रयत्न सुरू आहे.त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांकडूनही हेल्मेट वापराबाबत जनजागृती केली जात आहे. त्यासाठी आज शहरातील दुचाकी वितरकांची बैठक शहर वाहतूक नियंत्रण शाखेत घेण्यात आली. तेथे निरीक्षक धुमाळ यांनी या सूचना दिल्या.

केंद्रीय मोटारवाहन कायद्यानुसार दुचाकीची खरेदी करतानाच खरेदीदाराने दोन हेल्मेट खरेदी करणे आणि दुचाकी चालवताना त्याचा वापर करणे बंधनकारक आहे. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट घातले पाहिजे. पहिल्या टप्प्यात महामार्गांवरील हेल्मेट सक्तीने अनेकांचे प्राण वाचल्याचे सांगून निरीक्षक धुमाळ म्हणाले, ‘‘हेल्मेटचा वापर हा काही नवीन नियम किंवा कायदा नाही. हेल्मेटसक्ती कुणालाही त्रास देण्यासाठी नाही, तर वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी आहे. हेल्मेट ही गरज असून कायदेशीर तरतूदही आहे, त्यामुळे वितरकांनीही हेल्मेटच्या वापरासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे.’’ 

बैठकीत मोटार वाहन कायद्यानुसार वितरक ग्राहकांना हेल्मेट वापराबाबत माहिती देण्यात आली. हेल्मेट सक्तीबाबत प्रबोधन करण्याचेही आश्वासन वितरकांनी पोलिस प्रशासनाला दिले आहे. केवळ कागदोपत्री हेल्मेटची खरेदी न होता खरेदी केलेले हेल्मेट पाहूनच दुचाकी विक्रीची पुढील प्रक्रिया करण्याचे आश्वासन वितरकांनी बैठकीत दिले. सचिन कदम, संदीप कांबळे, राजेंद्र गुरव, किरण चोपडे, विद्यासागर आयरेकर, केतन पोवार, श्रद्धा सुर्वे, अमित माने, अनिल कांबळे, इरफान शेख आदी वितरक बैठकीस उपस्थित होते.