अख्खी जुना बुधवार पेठ श्रमदानाला एकत्र

अख्खी जुना बुधवार पेठ श्रमदानाला एकत्र

कोल्हापूर - गट, तट, पक्ष, संघटना हा भेद बाजूला ठेवून आज अख्खी जुना बुधवार पेठ श्रमदानासाठी एकत्र आली. सर्वजण एकत्र आले की, त्यातून काय चमत्कार घडू शकतो, याची झलकच दाखवली.

पेठेतील मैदानाच्या निमित्ताने सर्वजण श्रमदानासाठी एकत्र आले व त्यांनी वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जागेचे रुपडेच बदलून टाकले. या पेठेसाठी मैदान असावे, अशी पंचवीस ते तीस वर्षे सातत्याने मागणी होती. आज प्रत्यक्ष मैदानाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. आता सपाटीकरण, कुंपण वॉल, पदपथ, फुटबॉलसाठी गोल पोस्ट, फ्लड लाईटस्‌ ही कामे सुरू केली जातील. संयुक्त जुना बुधवार पेठेने या श्रमदानाचे आयोजन केले. 

श्रमदानाच्या निमित्ताने सकाळी सात वाजल्यापासून पेठेतील विविध तरुण मंडळांचे कार्यकर्ते एकत्र येऊ लागले. या मैदानाशी पेठेच्या असलेल्या भावनांची दखल घेत मधुरिमाराजे छत्रपती, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, शिवसेना युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, अनिल पाटील, अविनाश साळोखे, दीपक देसाई, नगरसेविका सरिता मोरे, माजी नगरसेवक धनंजय सावंत अशी दिग्गज मंडळीही एकत्र आली व श्रमदानास सुरुवात झाली. शाहू हायस्कूलने दहावीचे विद्यार्थीही रविवारचा जादा तास बाजूला ठेवून श्रमदानात सहभागी झाले.

बघता बघता मैदानावरील प्लास्टिक कागद, कचरा, कागद, दगडगोटे बाजूला झाले व मैदानाच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळ जवळ पूर्ण झाले. सुशील भांदिगरे, सुरेश दिंडे, अमर हांडे, महावीर पोवार, सागर गौड, ओंकार काशीद, महेश शिंदे, सुनील शिंदे, सुशांत महाडिक, प्रवीण डांगे, गणेश पाटील, विजय बंगडे, मानसिंग चित्रुक, अमर गायकवाड, सुनील घाग, आशिष भालकर, महेश लाड, संजय तोरस्कर यांनी श्रमदानाचे संयोजन केले. 

सर्व श्रेय पिरजादे यांना...
अलीकडे छोटे-मोठे काम केले की, त्या कामाचे वैयक्तिक व राजकीय श्रेय घेण्याची स्पर्धा असते, पण मैदानासाठी नगरसेवक अफजल पिरजादे यांनी दिलेल्या योगदानाचे सर्व श्रेय त्यांना या श्रमदानाच्या वेळी दिले गेले. राजकीय वैर विसरून सर्वांनीच त्यांना श्रेय देऊन या मैदानावर खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. 

बाटल्यांचा खच नको....
कोल्हापुरातल्या काही क्रीडा मैदानांवर दिवसा खेळ व रात्री बाटल्यांचा खच असा प्रकार या मैदानावर होणार नाही, ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे या वेळी मधुरिमाराजे यांनी  भाषणात सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com