कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तूर, खडकेवाडा ग्रामपंचायत ‘यशवंत’

कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तूर, खडकेवाडा ग्रामपंचायत ‘यशवंत’

कोल्हापूर - जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणारा यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार यंदा उत्तूर (ता. आजरा) व खडकेवाडा (ता. कागल) या ग्रामपंचायतींना विभागून प्रथम क्रमांक जाहीर झाला. गेल्यावर्षीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीला जाहीर झाला.

पुरस्कार वितरण शनिवारी (ता. १७) दुपारी १२ ला मार्केट यार्ड येथील शाहु सांस्कृतिक मंदिरात होणार आहे. ही माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेंद्र भालेराव यांनी दिली. गेल्यावर्षीचे आणि या वर्षीचे यशवंत ग्रामपंचायत, सरपंच व ग्रामसेवकांनाही हा पुरस्कार दिला जाणार आहे.

जिल्हास्तरीय यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार (२०१६-१७) : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) प्रथम व लाटगाव (ता. आजरा) द्वितीय. 

यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार (२०१७-१८) : उत्तूर (ता. आजरा) व खडकेवाडा (ता. कागल) तर बेले (ता. करवीर) द्वितीय. 
यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार तालुकास्तर (२०१६-१७) : आजरा ः लाटगाव प्रथम व पेद्रेवाडी द्वितीय. गगनबावडा ः वेसर्डे प्रथम व आसळज द्वितीय. भुदरगड ः डेळे-चिवाळे प्रथम व नवले द्वितीय. गडहिंग्लजः ऐनापूर प्रथम व करंबळी द्वितीय. चंदगड ः अलबादेवी प्रथम व इब्राहिमपूर द्वितीय. हातकणंगले ः शिरोली पुलाची प्रथम व किणी द्वितीय. करवीर ः कुडित्रे प्रथम व दोनवडे द्वितीय. कागल ः तमनाकवाडा प्रथम व बालेघोळ द्वितीय. पन्हाळा ः कळे-खेरिवडे प्रथम व कुशिरे तर्फ ठाणे द्वितीय. राधानगरी ः माजगाव प्रथम व शेळेवाडी द्वितीय. शिरोळ ः  कोंड्रिग्रे प्रथम व हसूर द्वितीय. शाहूवाडी ः बांबवडे प्रथम.

यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार तालुकास्तर (२०१७-१८) : आजरा ः उत्तूर प्रथम व वेळवट्टी द्वितीय. गगनबावडा ः असंडोली प्रथम तळीय बुद्रुक द्वितीय. भुदरगड ः पाळ्याचाहुडा प्रथम व राणेवाडी द्वितीय. गडहिंग्लज ः हेब्बाळ-जळद्याळ प्रथम व शिप्पूर तर्फ नेसरी द्वितीय. चंदगड ः नागनवाडी प्रथम व मुरकुटेवाडी द्वितीय. हातकणंगले ः पट्टणकोडोली प्रथम व चावरे द्वितीय. करवीर ः बेले व भुयेवाडी द्वितीय. कागल ः खडकेवाडा प्रथम व गोरंबे द्वितीय. पन्हाळा ः पोर्ले तर्फ ठाणे प्रथम व कोडोली द्वितीय. राधानगरी ः घोटवडे प्रथम व तळाशी द्वितीय. शिरोळ ः घोसरवाड व बस्तवाड (विभागून प्रथम). शाहूवाडी ः आकुर्ळे प्रथम व भेडसगाव द्वितीय.

यशवंत सरपंच पुरस्कार तालुकास्तर (२०१६-१७) ः कल्याणी सरदेसाई (लाटगाव, ता. आजरा), श्रावण भारमल (डेळे-चिवाळे, ता. भुदरगड), धोंडिबा घोळसे (अलबादेवी, ता. चंदगड), कृष्णात पाटील (वेसर्डे, ता. गगनबावडा), ॲड. दिग्वीजयसिंह कुराडे (आयनापूर, ता. गडहिंग्लज), बिसमिल्ला महात ( शिरोली पुलाची, ता. हातकणंगले), दत्तात्रय चव्हाण (तमनाकवाडा, ता. कागल), विजय ऊर्फ सरदार पाटील (कुडित्रे, ता. करवीर), सरिता पाटील (कळे-खेरिवडे, ता. पन्हाळा), सविता चौगले (माजगाव, ता. राधानगरी), नानासाहेब कांबळे (कोंडिग्रे, ता. शिरोळ) व विष्णू यादव (बांबवडे, ता. शाहूवाडी).

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार (२०१६-१७) : संदीप चौगले (देवर्डे, ता. आजरा), दत्तात्रय माने (मडिलगे खुर्द, ता. भुदरगड), अमृत देसाई (हलकर्णी, ता. चंदगड), संदीप धनवडे (कसबा नूल, ता. गडहिंग्लज), अमित पाटील (वेतवडे, ता. गगनबावडा), निवृत्ती कुंभार (कौलगे-खडकेवाडा, ता. कागल), संदीप तेली (वरणगे, ता. करवीर), आनंदा तळेकर (कुशिरे तर्फ ठाणे, ता. पन्हाळा), रमेश तायशेटे (ओलवण, ता. राधानगरी), जमीर आरकाटे (मजरेवाडी, शिरोळ) व भास्कर भोसले (कांडवण, ता. शाहूवाडी). 

यशवंत सरपंच पुरस्कार (२०१७-१८) 
हर्षदा खोराटे (उत्तूर, ता. आजरा), सरिता तेजम (पाळ्याचाहुडा, ता. भुदरगड), रवींद्र बांदिवडेकर (नागनवाडी, ता. चंदगड), युवराज पाटील (आसंडोली, ता. गगनबावडा), अरविंद दावणे (हेब्बाळ-जळद्याळ, ता. गडहिंग्लज), खाना अवघडे (पट्टण-कोडोली, ता. हातकणंगले), नंदिनी घोरपडे (खडकेवाडा, ता. कागल), राजेद्र कारंडे (बेले, ता. करवीर), भाऊसाहेब चौगुले (पोर्ले तर्फे ठाणे, ता. पन्हाळा), भारती डोंगळे (घोटवडे, ता. राधानगरी), बाबासाहेब पुजारी (घोसरवाड, ता. शिरोळ (विभागून), प्रज्ञा चव्हाण (बस्तवाड, ता. शिरोळ (विभागून) व सर्जेराव पाटील ( आकुर्ळे, ता. शाहूवाडी).

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार (२०१७-१८) 
रणजित पाटील (लाटगाव, ता. आजरा), अनिमा इंदुलकर (मेघोळी, ता. भुदरगड), जनाबाई जाधव (उमगाव, ता. चंदगड), प्रमोद जगताप (खंमलेहट्टी, ता. गडहिंग्लज), पांडुरंग मेंगाने (आसंडोली, ता. गगनबावडा), संतोष चव्हाण (भेंडवडे, ता. हातकणंगले), सागर पार्टे (सोनाळी, ता. कागल), राजेंद्र गाडवे (गडमुडशिंगी, ता. करवीर), कृष्णात पोवार (कोलिक, ता. पन्हाळा), लक्ष्मण इंगळे (तारळे खुर्द, ता. राधानगरी), भाग्यश्री केदार (चिंचवाड, ता. करवीर) व सुनील सुतार (नांदगाव, ता. शाहूवाडी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com