वाहन करवाढीचा दणका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

दोन टक्‍क्‍यांची करवाढ; आरटीओकडून अंमलबजावणी 
कोल्हापूर - खासगी वाहनांच्या एकरकमी करात दोन टक्‍क्‍यांनी वाढ करण्यात आली असून, प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत त्याच्या अंमलबजावणीस सुरवात झाली आहे. वाहनांची मूळ किंमत, अधिक जीएसटी अशा एकूण रकमेवर ही करआकारणी केली जाणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी पत्रकारांना सांगितले. 

वस्तू व सेवा कर १ जुलैपासून लागू करण्यात आला. यामुळे मूल्यवर्धित कर आणि जकात कर रद्द केला. त्यामुळे राज्याची महसूलअंतर्गत होणारी तूट टाळण्यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियमान्वये बसविल्या जाणाऱ्या मोटार वाहन करात दोन टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे. तसा सुधारणा केलेला अध्यादेश प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) पाठविला आहे. यापूर्वी ७, ८ आणि ९ टक्के वाहनांवरील करात प्रत्येकी २ टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे. विना प्रवासी व मालवाहतूक न करणाऱ्या करणाऱ्या अर्थात दुचाकी, तीनचाकी, मोटारींवर इंजिन क्षमतेवर करवाढ निश्‍चित आहे. 

पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांसाठी कर
१० लाखांपर्यंत किमतीच्या वाहनांसाठी ११ टक्के 
१० लाखांपेक्षा धिक आणि २० लाखांपर्यंत किमतीच्या वाहनांना १२ टक्के 
२० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या वाहनांसाठी १३ टक्के 

डिझेलवर चालणाऱ्या वाहनांसाठी कर  
१० लाखांपर्यंत किमतीच्या वाहनांसाठी १३ टक्के
१० लाखांपेक्षा अधिक आणि २० लाखांपर्यंत किमतीच्या वाहनांना १४ टक्के 
२० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या वाहनांना १५ टक्के 

सीएनजी, एलपीजी वाहनांसाठी कर
१० लाखांपर्यंत किमतीच्या वाहनांसाठी ७ टक्के
१० लाखांपेक्षा अधिक आणि २० लाखांपर्यंत किमतीच्या वाहनांना ८ टक्के २० लाखांपेक्षा अधिक किमतीच्या वाहनांना ९ टक्के