सद्गुरू मुनिंद्र विश्वनाथ महाराज रुकडीकर सोहळ्यास प्रारंभ

राजेंद्र घोरपडे
रविवार, 14 जानेवारी 2018

कोल्हापूर -  श्री सद्गुरू मुनिंद्र विश्वनाथ महाराज रूकडीकर यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास आज विश्वपंढरी येथे प्रारंभ झाला. सात दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात राज्यभरातून भाविक सहभागी होतात. श्री ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचने, कीर्तने, गायन असे भक्तीमय विविध कार्यक्रम या काळात होतात.

सकाळी सात वाजता परमपूज्य दादा महाराज सांगवडेकर यांच्या निवासस्थानापासून श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर यांच्या पालखीला प्रारंभ झाला. श्री गुरूबाबा आैसेकर महाराज गेली कित्येक वर्षे या सोहळ्यात सेवा देतात. त्यांच्या हस्ते या पालखी सोहळ्याची सुरूवात झाली. पांढऱ्या शुभ्र वेशात अनेक भाविक हातात टाळ मुदुंग घेऊन श्री ज्ञानेश्वर, तुकारामांचा जयघोष करत या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. महिलांही डोक्यावर तुळस घेऊन सहभागी झाल्या होत्या. या पालखीने विश्वपंढरी परिसरात भक्तीचा मळाच फुलला आहे. 

विश्वपंढरी येथे पादुकांची प्रतिष्ठापनेनंतर श्री ज्ञानेश्वरी पारायणास प्रारंभ होतो. सात दिवस हा सोहळा सुरु राहणार आहे. 

Web Title: Kolhapur News Vishwanath Maharaj Rukadikar Festival