वारणा चोरी प्रकरण: सूत्रधार मैनुद्दीन मुल्लाला अटक

राजेश मोरे 
रविवार, 13 ऑगस्ट 2017

वारणानगर येथील वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्राध्यापक कॉलनीतील एका फ्लॅटमधील 12 मार्च 2016 झालेल्या 3 कोटी 11 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी मैनुद्दीन ऊर्फ मोहिद्दीन अबुबकर मुल्ला (वय 42, रा. बेथेलहेमनगर, मिरज) सांगली पोलिसांनी अटक केली.

कोल्हापूर : वाराणानगर (ता. पन्हाळा) येथील कोट्यावधी चोरी प्रकरणातील मुुख्य सूत्रधार मैनुद्दीन मुल्लाला सीआयडीच्या पथकाने काल रात्री पिंपरी चिंचवड येथून अटक केली.

न्यायालयाने त्याला 19 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे सीआयडीचे प्रभारी पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले. त्याच्या अटकेनंतर अनेकांचे दाबे दणाणले असून तपासाला गती मिळणार असे पोषक वातावरण तयार झाले आहे.दरम्यान पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र पाटील याच्या घरांवर तीन ठिकाणी तपास यंत्रणेकडून छापे टाकण्यात आले. 

वारणानगर येथील वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्राध्यापक कॉलनीतील एका फ्लॅटमधील 12 मार्च 2016 झालेल्या 3 कोटी 11 लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी मैनुद्दीन ऊर्फ मोहिद्दीन अबुबकर मुल्ला (वय 42, रा. बेथेलहेमनगर, मिरज) सांगली पोलिसांनी अटक केली. मुल्लाकडून चोरीची रक्कमही जप्त केली. त्यानंतर या फ्लॅटची तपासणी करताना तेथे पुन्हा 1 कोटी 31 लाख 29 हजारांची रोकड पोलिसांना सापडली.