वाटल्यास उदयन राजेंना अटक करु: नांगरे पाटील

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

कायदा हा सर्वांसाठी समानच असल्या'ची भावना व्यक्‍त करत नांगरे पाटील यांनी आवश्‍यकता भासल्यास भोसले यांना अटक करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे

कोल्हापूर - खंडणी मागितल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांना गरज पडल्यास अटक करण्यात येईल, अशी स्पष्टोक्ती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी आज (बुधवार) केली.

या प्रकरणी न्यायालयाने भोसले यांना जामीन फेटाळल्याने आता पोलिसांच्या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर, नांगरे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. "कायदा हा सर्वांसाठी समानच असल्या'ची भावना व्यक्‍त करत नांगरे पाटील यांनी आवश्‍यकता भासल्यास भोसले यांना अटक करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणी आत्तापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे.