अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - अंबाबाई मंदिर व भवानी मंडप परिसरात आज ‘सकाळ’च्या डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क-‘यिन’ च्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत परिसरातून चार पोती ओला कचरा, एक पोते प्लास्टिक व दोन पोती सुका कचरा, असा सात पोती कचरा संकलित झाला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ही मोहीम राबवण्यात आली.   

अंबाबाई मंदिर आणि भवानी मंडप परिसरात नुकताच नवरात्रोत्सव साजरा झाला. त्यानिमित्ताने या परिसरात सोळा लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. उत्सव काळात विविध घटकांनी स्वच्छता मोहीम जरुर राबवली; पण त्यातूनही काही कचरा अडचणीच्या ठिकाणी शिल्लक राहिला होता. हा कचरा काढण्याचा संकल्प ‘यिन’च्या टीमने केला आणि सकाळी साडेसातपासून मोहिमेला प्रारंभ केला. दोन तासात त्यांनी हा सारा परिसर चकाचक करून टाकला. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांनी मोहिमेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

कार्यकारी संपादक मनोज साळुंखे म्हणाले, ‘‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क- ‘यिन’च्या माध्यमातून राज्यभरात हजारो तरुणांचे नेटवर्क उभारले आहे. कोल्हापुरात रोज दोनशे टन कचरा जमा होतो. ‘यिन’च्या टीमने आज राबवलेली मोहीम तमाम तरुणाईला नक्कीच प्रेरणादायी आहे.’’ ‘यिन’ समन्वयक सूरज चव्हाण यांनी संयोजन केले.