विद्यापीठ ‘क्विक-हिल’ यांच्‍यात सामंजस्य करार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाचा संगणकशास्त्र अधिविभाग व अग्रमानांकित अँटीव्हायरस कंपनी ‘क्विक-हिल’ यांच्यात पुणे येथे सामंजस्य करार झाला. विद्यापीठातर्फे कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर यांनी तर क्विक-हिलतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश काटकर यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. करारान्वये कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन सायबर सिक्‍युरिटीचा अभ्यासक्रम शिकता येईल.

नोकरीच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्राध्यापकांना ज्ञान अद्ययावत करण्यासाठी ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’ आयोजित करण्यात येणार आहे. त्याचे प्रादेशिक केंद्र विद्यापीठाचा संगणकशास्त्र असेल. केंद्राच्या माध्यमातून संलग्नीत महाविद्यालयांतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाचा उद्देश माहीती तंत्रज्ञान  उद्योगासाठी आवश्‍यक कुशल मनुष्यबळ तयार करणे हा असेल. माहीती तंत्रज्ञान सुरक्षा उद्योगाच्या मापदंडाप्रमाणे सी, सी++ या प्रोग्रॅमिंग भाषांचे व्यावसायिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणार असल्याने विद्यार्थी रोजगारक्षम होतील, अशी अपेक्षा कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी व्यक्त केली. करारासाठी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

सायबर अवेरनेस लिटरसी सेलच्या सी.ए.एल.सी. माध्यमातून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये क्विक-हिल फाऊंडेशनतर्फे संगणकशास्त्र अधिविभागातील विद्यार्थ्यांना सायबर साक्षरतेचे प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षणार्थी ‘कमवा आणि शिका’ उपक्रमाअंतर्गत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांत सायबर साक्षरतेबद्दल जनजागृती करतील, असे संगणकशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. आर. आर. मुधोळकर यांनी स्पष्ट केले. या प्रसंगी डॉ. व्ही. एस. कुंभार, प्रा. के.जी. खराडे, क्विक-हिलचे सी. एस. आर. व्यवस्थापक अजय शिर्के, सुगंधा दाणी उपस्थित होते.