उष्म्याबाबत प्रशासन झाले जागे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

कोल्हापूर - उष्णतेच्या लाटेमुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची तसेच प्रसंगी शारीरिक ताण पडून मृत्यू ओढवण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांनी कारणाशिवाय उन्हात बाहेर पडू नये, तसेच उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी विविध प्रसार माध्यमातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच सूचना प्रसारित होत असतात, त्याचाही अवलंब करावा, असे सांगून संजय शिंदे यांनी उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. 

खबरदारी अशी घ्या 
तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावीत. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट व चपलाचा वापर करावा. प्रवासात पाण्याची बाटली सोबत घ्यावी. जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा, तसेच ओल्या कापड्यांनी डोके, मान चेहरा झाकावा. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओआरएस घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणार घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवावे. त्यांना पुरेसे पाणी पिण्यास द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा, तसेच रात्री खिडक्‍या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळावा. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करा. बाहेर कामकाज करत असताना मध्ये मध्ये आराम करावा. गर्भवती कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घ्यावी. 

काय करू नये 
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत तसेच दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत बाहेर काम करण्याचे टाळावे. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. 

मोकळ्या हवेसाठी स्वयंकपाकघराची दारे व खिडक्‍या उघडी ठेवावीत. शारीरिक पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेला चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय यांचा वापर टाळावा. शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: kolhapur weater