आपटी : पोर्लेतील चोरीचा चार दिवसांत छडा

उत्रेतील संशयित महिलेस अटक; मुद्देमाल केला जप्‍त
police
policesakal

आपटी : पोर्ले येथील दीपक भागाजी काशीद यांच्या घरी आलेल्या पाहुणीने तिजोरीचे कुलूप तोडून तीन लाख दहा हजार आठशे रुपयांचे सोन्याचे दागिने पळविल्याची फिर्याद दीपक काशीद यांनी पन्हाळा पोलिसांत १७ जूनला दिली होती. पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून सौ. प्रियांका सरदार पाटील (वय ३५, उत्रे ता. पन्हाळा) हिला ताब्यात घेतले. प्रियांकाने चोरीची कबुली दिली. चोरलेल्या दागिन्यांपैकी तीन लाखाचे दागिने हस्तगत करत अवघ्या चार दिवसांत चोरीचा छडा लावला.

पन्हाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोर्ले तर्फ ठाणे येथील दीपक भागोजी काशीद यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी जबरी चोरी झाली होती. चोरीत चित्ताक, बोरमाळ, लप्पा, अंगठी, चेन, टॉप्स व कडे असे दागिने चोरीला गेले होते. दरम्यान नात्यातील महिला पाहुणी आली होती अशी माहिती दिली होती. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित म्हणून प्रियांका सरदार पाटील हिला अटक करून खाक्या दाखवताच कबुली दिली. संशयित महिलेस पन्हाळा येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. महिलेने घरात लपवून ठेवलेले तीन लाखाचे दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक रवींद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंद काळे, अंमलदार एम. ए. नाईक, सहाय्यक फौजदारी गेंगजे, के. एस. पाटील, बाजीराव चौगुले व यादव यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com