चंद्रकांतदादांची ऋतुराज पाटलांना 'जादू की झप्पी'; कोल्हापुरमध्ये भुवया उंचावणारे चित्र

कसबा बावड्यातील चित्र; चंद्रकांत पाटील म्हणाले, मी घरीच येणार होतो, पण..
kolhapur
kolhapuresakal

कोल्हापूर : विधानसभेच्या कोल्हापूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूकीत सकाळी 9 नंतर चुरस वाढत आहेत. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) व कॉंग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांनी कसबा बावडा येथील मतदान केंद्रावर गळाभेट घेतली. तसेच, ऋतुराज पाटील यांच्याकडूनच पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांना शुभेच्छा देत मी घरीच येणार होतो, पण तुम्ही बाहेर पडला असाल म्हणून आलो नसल्याचेही चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले आहे. (Kolhapur Assembly By Election 2022)

kolhapur
कोल्हापूर - मतदानाच्या सुरुवातीलाच निवृत्ती चौकात वादावादी

दरम्यान, कसबा बावडा येथे चुरशीने मतदान सुरु आहे. निर्णायक ठरणाऱ्या कसबा बावडा मतदान केंद्रावरच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते तळ ठोकून आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुथवर थांबूनच मतदारांचे स्वागत केले. तर, आमदार ऋतुराज पाटील यांनी सर्वांना अभिवादन करत मतदान करण्याचे आवाहन केले. या ठिकाणी मतदारांना हलगी व कैताळ वाजवतच मतदान केंद्रावर आणण्यात आले. त्यामुळे कसबा बावडा मतदान केंद्रावर मतदानासाठी मोठी गर्दी झाली आहे. मतदारांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. दरम्यान, चंद्रकांतदादा व ऋतराज पाटील यांच्यामधील खेळीमेळीच्या संवादाने कार्यकर्ते आश्‍चर्य चकित झाले.

kolhapur
Kolhapur Assembly By Election : विक्रमी संख्येनं मतदान करू, लोकशाही समृद्ध बनवू - सतेज पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com