जोतिबा चैत्र यात्रा विशेष : लग्नाच्या आमंत्रणाचा बगाड

मंदिराच्या दक्षिण बाजूचे महाद्वार म्हणजे चौघडा कमान
जोतिबा चैत्र यात्रा
जोतिबा चैत्र यात्राsakal

जोतिबा मंदिराच्या दक्षिण बाजूचे महाद्वार म्हणजे चौघडा कमान. या कमानीच्या वरच्या बाजूस ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचा पूर्वापार नगारखाना. काकड आरती वेळी तसेच अभिषेका वेळी त्यांच्याच सेवकाने हा नगारा वाजवण्याचा पायंडा. राजघराण्यातील कोणी सन्माननीय व्यक्ती आली, की तिलाही नगारावादनाने सलामी दिली जाते. या दक्षिण दरवाजालाच ‘फस्कीचा दरवाजा'' असे म्हटले जाते. या फस्कीच्या दरवाजासमोरच ५० ते ६० फुटांवर काळ्या कातीव दगडाचा नक्षीदार चबुतरा आणि त्यावर उभारलेला षट्‍कोनी आकाराचा दगडी स्तंभ, तेलाच्या ओघळाने रापलेला. याचेच नाव ''बगाड.'' धनाजी ऊर्फ आबाजी पाटील यांनी या बगाडातील स्तंभ आश्विन शु. १० शके १३३० मध्ये म्हणजे ऑक्टोबर १४०८ च्या दरम्यान उभा केला. त्यांनी हा खांब उभा केल्याने या घराण्यास त्या वेळेपासून ''खामकर'' हे आडनाव पडले.

या खांबाबद्दल खामकर घराण्यास चार बिघे जमीन, मानाचे पागोटे, नारळ आणि पानाचा विडा असा मान मिळाल्याचा उल्लेख येथील एका शिलालेखावर असून, त्याची मोडी लिपीतील सनदही आहे. जोतिबावर लग्नकार्याच्या वेळी या बगाडाच्या स्तंभावर तेल घातले जाते. तसेच नाडापुडी, भिजाणे, लिंबू, नारळ, विडा, पान-सुपारी ठेवून लग्नास येण्याचे आमंत्रण दिले जाते. लग्नकार्याच्या प्रारंभाचा मान या बगाडास आहे.

बगाडाचा चौथरा अतिशय रेखीव असून, त्या खाली कोरलेल्या हत्तीच्या मूर्ती तसेच इतर कलाकुसरीच्या मूर्ती काळाच्या ओघात दुर्लक्षित होऊ लागल्या असून. कारणापुरताच चौथऱ्याचा वापर होऊ लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com