कोल्हापूर-अहमदाबाद विमान सेवेस प्रतिसाद

आठवड्यातून तीन दिवस नियमित उड्डाण सुरू झाले
विमान
विमान sakal

उजळाईवाडी : कोल्हापूर विमानतळावरून ३० ऑक्टोबर २०२१ पासून खंडित असलेली कोल्हापूर अहमदाबाद विमान सेवा सुरू झाली. आठवड्यातून तीन दिवस नियमित उड्डाण सुरू झाले असून, या सेवेला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. काल एका दिवसात विक्रमी तब्बल १३६ प्रवाशांनी लाभ घेतला.

यामध्ये अहमदाबादवरून कोल्हापूरसाठी ७८ प्रवासी आले असून, कोल्हापूरहून अहमदाबादकडे ५८ प्रवाशांनी उड्डाण केले. इंडिगो एअरलाइन्सचे विमानाने काल सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी अहमदाबाद येथून कोल्हापूरकडे उड्डाण केले. दुपारी १२ वाजता कोल्हापूर विमानतळावर लँडिंग झाले. दुपारी साडेबारा वाजता पुन्हा विमानाने अहमदाबादसाठी टेक ऑफ केले व दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी अहमदाबादमध्ये पोहोचले. आठवड्यातील दर सोमवारी, शुक्रवारी व रविवारी सेवा सुरू राहणार असून, कोल्हापूर अहमदाबाद मार्गावरील विमान सेवेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता सध्या आठवड्यातील तीन दिवस सुरू असणारे विमानसेवा आठवडाभर सुरू करण्याविषयी मागणी जोर धरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com