कोल्‍हापूर : कोणी अंगावर आलं तर सोडणार नाही ;अरुण दुधवडकर

कार्यकर्त्यांचा गैरसमज दूर करण्याचा मेळाव्यात निर्धार
 Arun Dudhwadkar
Arun Dudhwadkarsakal

कोल्‍हापूर : शिवसेना अजूनही भक्कम आहे. आम्ही कोठेही जाळपोळ करणार नाही. कोणी अंगावर आले तर सोडणार नाही, असा इशारा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज येथे दिला. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कार्यकर्त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी बैठका, मेळावे घेण्याचा निर्णय आजच्या शासकीय विश्रामगृहातील मेळाव्यात घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. कोणी गेले म्हणून थांबले नाही नारायण राणे गेले नंतर त्यांचा पराभव झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून निघाले तेव्हा दुतर्फा असलेले लोक हे ज्ञात अज्ञात होते. त्यांनी पक्षप्रमुखांना विश्‍वास दिला. आता हाच विश्‍वास कार्यकर्त्यांपर्यंत पोचविण्यासाठी मेळावा होता.’ आजच्या बैठकीत शिवाजी पेठेतील सच्चे शिवसैनिक उठून गेले. या प्रश्‍नावर दुधवडकर म्हणाले, ‘सुजित चव्हाण कोठे आहेत असे विचारले होते. ते काळा टी शर्ट घालून मागील बाजूस बसले होते सभागृहातून बाहेर पडले त्यावेळी मी सुजित निघाला आहे, असे म्हटले. संजय पवार यांनी कॉल करून पुन्‍हा बोलावून घेतले आणि ते आले.

राजेश क्षीरसागर बंडखोर गटाकडे गेले आहेत. त्यांच्याबाबत काय, यावर सगळे आमचेच आहेत, त्यावर पक्षप्रमुख निर्णय घेतील असे सांगितले.संजय पवार म्हणाले, ‘शिवालय हे नाव वैयक्तिक कार्यालयाचे आहे. पक्षप्रमुखांची त्याला परवानगी असती तर ते शिवसेनेचे असते. त्यावर टिकटिप्पणी होत असेल तर त्याचा शिवसेनेशी काही संबंध नाही.’

विजय देवणे म्हणाले, ‘‘आम्ही ज्या ठिकाणी बसतो तेथे आमचे कार्यालय आहे. कोणी मातोश्री म्‍हणून नाव दिले म्हणजे ते पक्षप्रमुखांचे घर होणार नाही.

माजी आमदार उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, असुरशे साळोखे, तसेच शिवाजी जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com