कोल्हापूर : कंपनी बदला, ठोक मानधनावर घ्या

टिपरचालक करणार प्रशासकांकडे मागणी; कचरा उठाववर परिणाम
kolhapur municipal corporation
kolhapur municipal corporationsakal

कोल्हापूर : ठेकेदाराकडून पगार व प्रॉव्‍हिडंट फंड वेळेवर जमा होत नसल्याने कचरा उठाव करणारे टिपरचालक आक्रमक झाले आहेत. सोमवारी ते एक फेरी करून प्रशासकांना भेटून कंपनी बदला व आम्हाला ठोकमानधनावर घ्या, अशी मागणी करणार आहेत. त्यामुळे उद्याही कचरा उठाववर परिणाम होणार आहे.

सहा महिन्यांपासून पगार व प्रॉव्‍हिडंट फंडाबाबत डी. एम. कंपनीच्या टिपरचालकांच्या तक्रारी आहेत. त्यांनी अनेकवेळा कामबंद आंदोलन केले. त्यावेळी आश्‍वासन दिले जाते; पण पुढे ‘जैसे थे’ राहते. या महिन्याचाही पगार जमा झाला नसल्याने टिपरचालकांनी शनिवारी काम बंद केले. १०४ टिपरचालकांनी टिपर वर्कशॉपमध्ये जमा केली. त्यानंतर दुपारी ठेकेदार कंपनीकडून लेखी आश्‍वासन दिल्यानंतर काम सुरू केल्याचे महापालिकेच्या वतीने सांगितले; पण कचरा उठाव फारसा झाला नाही.

रविवारी कचरा उठावला सुटी होती. त्यामुळे दोन्ही दिवसांचा कचरा घरोघरी साठून राहिला. कंपनीकडून सतत पगार वेळेवर केला जात नसल्याने टिपरचालक वैतागले आहेत. त्यामुळे सोमवारीही सकाळी एक फेरी करून या ठेकेदार कंपनीचे टिपरचालक प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेणार आहेत.

यावेळी ही कंपनी बदला व आम्हाला ठोक मानधनावर घ्या, अशी मागणी करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com