कोल्हापूर : चुकीच्या नकाशावर पूररेषा !

शहरात काही रस्ते दाखविले चुकीचे; जिल्हाधिकारी कार्यालयही हलविले
Kolhapur-Flood
Kolhapur-Flood

कोल्हापूर : शहराच्या मूळ नकाशात मोडतोड करून पूररेषा नकाशा निश्चित केल्याचे दिसते. काही रस्ते चुकीच्या ठिकाणी व पद्धतीने दाखविले आहेत, तर काही ठिकाणी रस्त्यांची रुंदी खूपच वाढविली आहे. महावीर गार्डन शेजारील जिल्हाधिकारी कार्यालय चक्क हलविले आहे. जिल्हा परिषद नजीकचा रस्ताच जिल्हाधिकारी कार्यालयाचा रस्ता दाखविला आहे. अशाप्रकारे मोडतोड करून केलेल्या नकाशावर निळी आणि लाल पूररेषा दाखविली आहे. त्यामुळे पूररेषेच्या निळ्या आणि लाल रेषेच्या अंमलबजावणीवरही प्रश्न चिन्ह उपस्थित होते. विशेष म्हणजे हा नकाशा जलसंपदा विभागाने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.

जलसंपदा विभागाकडील माहितीनुसार पंचगंगा नदी पात्रांच्या परिसरात पूररेषा निश्‍चित करण्याच्या सर्वेक्षणसाठी एका ठेकेदाराला काम दिले होते. त्याचे सर्वेक्षण त्यांनी डीफ्रेन्शियल ग्लोबल पोझिशन सिस्‍टीमची (डीजीपीएस) मदत घेऊन केले. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आयआयटी मुंबईकडून निरीक्षण नोंदवून तो योग्य असल्याचे अधोरेखित केले. त्यांच्याबरोबरच जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता व इतर अधिकाऱ्यांनीही हा नकाशा योग्य असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

Kolhapur-Flood
कौजलगीत बनवल्या पर्यावरणपूरक राख्या; गायीच्या शेणाचा वापर

प्रत्यक्षात नदीपात्रापासून पुढे निळी रेषा असते. या ठिकाणी कोणतेही बांधकाम करता येत नाही किंबहुना तेथे इमारती बांधता येत नाहीत. मात्र, ड्रेनेज लाईन, विजेचे पोल उभा करता येतात. पिके घेता येतात. तसेच निळ्या रेषेपासून लाल रेषेपर्यंत नियमांना अधिन राहून बांधकाम करता येते. त्यामुळे या पूररेषेला अधिक महत्त्‍व आहे. या सर्व बाबींमुळे पूररेषेबाबतच्या नियमावलीची अंमलबजावणी करणे जिकिरीचे झाले. किंबहुना त्यात संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे दिसून येते. तरीही महापालिकेने त्याचे गटक्रमांक जाहीर केले आहेत. प्रत्यक्षात मात्र त्याची जागेवर आखणी झालेली दिसत नाही.

पूररेषेचे काय झाले?

पंचगंगा नदीची पूररेषा निश्‍चित करण्याचे ठरले

जलसंपदा विभागाकडून प्रस्ताव तयार झाला

ठेकेदाराला सर्वेक्षणचे काम दिले

जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर

सध्या तो नकाशा प्रसिद्ध

महापालिकेने याची अंमलबजावणी केली आहे.

निदर्शनास काय आले?

त्रुटी असलेल्या नकाशावर रेड, "ब्ल्यू लाईन

जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारील रस्ता प्रत्यक्षात सुमारे ९ मीटर (सुमारे ३० फूट)ः नकाशात १२० मीटर (सुमारे ३६० फूट)

महावीर गार्डन शेजारी जिल्हाधिकारी कार्यालय : नकाशात जिल्हा परिषदेच्‍या बाजूला

जिल्हा परिषद, हॉटेल पाटलाचावाडा हा रस्ता नकाशात जिल्हाधिकारी कार्यालयाचा रस्ता दाखविला

नकाशात ॲसेम्बली रस्त्याच्या दोन्ही बाजूतील उंची मध्ये

६ फुटाचा फरक

पाच बंगल्यापासून पुढे रस्ता परीख पुलाकडे आहे ः नकाशात तो रेल्वे फाटकावरून दाखविला. प्रत्यक्षात येथे रस्ताच नाही.

रेल्वे फाटक आहे

सुभाष रोड स्टेशन रोडला मिळतो : नकाशात तो मिळालाच नाही

व्हिनस कॉर्नरमध्ये चौक आहे. : नकाशात अप्सरा टॉकीजकडील रस्ता चौकापासून बाजूला

दोन भागात संपूर्ण नकाशा : प्रत्यक्षात हिरव्या रेषेला (पूरस्थिती)

एका भागात ५४६ म्हटले आहे, दुसऱ्या भागात याच रेषेला

५४७ म्हटले आहे.

पंचगंगा नदी पात्राशेजारील सध्या प्रसिद्ध झालेली जी पूररेषा आहे, ती योग्य आहे. शास्त्रीय पद्धतीने ती निश्‍चित केली आहे. प्रसिद्ध नकाशात काही वास्तू आणि रस्त्यांचे स्थान बदलेले दिसते, हेही खरे आहे. महापालिकेकडे एकास पाच हजार स्केलचा असा नकाशा मागितला होता. प्रत्यक्षात त्यांच्याकडून एकास चौदा हजार स्केलचा नकाशा मिळाला. त्यावर ही रेषा निश्‍चित केल्यामुळे काही ठिकाणी फरक दिसतो. सध्या २०२१च्या महापुराचे अपडेट घेऊन नवीन रेषा निश्‍चित करण्याचे काम सुरू आहे. साधारण दीड-दोन महिन्यांनी ते होईल. त्यानंतर हा नकाशाही एकास पाचहजार स्केलप्रमाणे निश्‍चित करून नकाशातील त्रुटीही दूर करू.

- महेश सुर्वे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागाने दिलेल्या पूररेषा पाहता तो चुकीच्या पद्धतीने बनविलेल्या नकाशावर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. रस्त्यांची रुंदी काही ठिकाणी चुकली आहे. काही वास्तूही चुकीच्या ठिकाणी आहेत. यामुळे पूररेषेबाबतची अंमलबजावणी करणे जिकिरीचे ठरू शकते.

- शांताराम सुर्वे, जीआयएस अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com