कोल्हापूर : महामार्गावरील लुटारूंची टोळी जेरबंद

लूटमार करणाऱ्या चौघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले
टोळी जेरबंद
टोळी जेरबंदsakal

कोल्हापूर : कोकण, कर्नाटकसह कोल्हापुरातील महामार्गावर रात्रीच्यावेळी मारहाण करून लूटमार करणाऱ्या चौघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. त्याच्याकडून ११ गुन्ह्यांची उकल करून पावणेतीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला. रोहित भरत मोरे (वय २१), नागेश ऊर्फ गंगाराम लक्ष्मण गावडा (वय २१, दोघे मोरेवाडी), अक्षय सतीश सोनवणे (वय १९), शुभम जयसिंग सातपुते (वय २३, दोघे सुभाषनगर) अशी संशयितांची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला रेकॉर्डवरील संशयित नागेश ऊर्फ गंगाराम व त्याचे साथीदार हायवेवरील पंचगंगा पुलाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोटारसायकल, दोन मोबाईल संच, जांबीया, लोखंडी कटावणी मिळून आली. चौकशीत त्यानी चार दिवसांपूर्वी लक्ष्मी टेकडी ते कागल रस्त्यावर मोटारसायकलस्वाराला मारहाण करून मोटारसायकल व मोबाईल संच काढून घेतल्याची कबुली दिली. अशा पद्धतीचे ११ गुन्हे उघडकीस आणण्यात पथकाला यश मिळाले. त्याच्याकडून मोटारसायकल, मोबाईल संचसह एकूण २ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याचे गोर्ले यांनी सांगितले.

जिल्ह्यातील गुन्हे

संशयितांकडून कागल येथील चार, जयसिंगपुरातील तीन, हातकणंगले, इस्पुर्ली, गोकुळ शिरगाव आणि कणकवली येथील प्रत्येकी एक अशा ११ गुन्ह्यांची उकल केल्याचे गोर्ले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com