कोल्हापूर : नूतनीकरणाचा प्रस्ताव ‘जैसे थे’ स्थितीत

चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालयाच्या विकासाचा प्रश्न प्रलंबित
चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालय
चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालयSAKAL

कोल्हापूर भारदस्त, तितक्याच बुलंद अभिनयाने मराठी चित्रपट रसिकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत मांडरे हे जसे अभिनेते होते, तसे ते नामांकित चित्रकारही. त्यांनी आयुष्यभर रेखाटलेली चित्रे व शिल्पकला अशा कलाकृतींचे स्वतःच्या बंगल्यात संग्रहालय केले. हा ठेवा त्यांनी मोठ्या मनाने राज्य शासनाला मोफत दान केला. पुढे हेच चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालय नव्या पिढीलाही प्रेरणा देत आहे. मात्र, या कलासंग्रहालायाच्या नूतनीकरणासाठी दोन कोटी रुपयांच्या प्रस्ताव शासनास दिला आहे. तो ‘जैसे थे’ स्थितीत पडून आहे. परिणामी, कलासंग्रहालयाच्या विकासाचा प्रश्न प्रलंबित आहे.

मराठी, हिंदी चित्रपट व नाटकांतील विविध भूमिका आजरामर करणाऱ्या (कै.) मांडरे यांनी मुंबईतील नामांकित कला महाविद्यालयातील चित्रकलेचेही शिक्षण घेतले होते. अभिनयातून वेळ मिळाल्यावर मांडरे यांनी चित्रे रेखाटली. पावडर शेडिंग, जलरंग कलेत त्यांचा हातखंडा होता. त्यांनी साकारलेल्या चित्रांत निसर्गचित्र, पोट्रेट, लॅण्डस्केप, व्यक्तिचित्र, स्थिरचित्र असे वैविध्य आहे. पावडर शेडिंगमध्ये साकारलेले प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांचे चित्र, विविध देश-विदेशातील निसर्गाच्या मनोहारी छटा अशी अनेक चित्रे संग्रहालयात आहेत. जवळपास ४७५ चित्रे, शिल्पकलेच्या वस्तू व स्वतःचा बंगला त्यांनी राज्य शासनाला दिला. राज्य शासनाचा सांस्कृतिक विभाग, त्यानंतर पुरातत्त्व वस्तुसंग्रहालयाकडे मांडरे कलासंग्रहालय

चालविण्यासाठी आले.

हे कलासंग्रहालय कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांसाटी खुले करण्यात आले. कोरोनाकाळात पर्यटन बंद असल्याने कोणी फिरकले नाही. सध्या पर्यटन सुरू झाले; पण कोल्हापुरात संग्रहालय आहे, याची माहिती फारशी नसल्याने दिवसभरात १० ते १५ पर्यटकांचे अपवाद वगळता फारसे कोणी येत नाही. परिणामी, संग्रहालयाच्या उद्देशालाच खीळ बसली आहे.

कलासंग्रहालयाच्या विकासाचा रखडलेला प्रस्ताव तातडीने मंजूर व्हावा. कलासंग्रहालयाचे मनुष्यबळ वाढावे. या कलासंग्रहालयाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोचावी. जेणेकरून राज्याच्या चित्रकलेचा वारसा समृद्ध होण्यासाठी कलासंग्रहालयाची देखभाल सक्षम व्हावी.

- मोहन पतंगे

कलासंग्रहालय सध्या सुरू आहे. कोरोना लॉकडाउननंतर पर्यटकांची संख्या कमी झाली. आउटसोर्सचे कर्मचारी येथे सुरक्षा व देखभालीसाठी तीन शिफ्टमध्ये असतात. संग्रहालयाच्या विकासासाठी शासनाला प्रस्ताव दिला आहे. त्यातून पूर्ण नूतनीकरण होईल. शासनाची मान्यता मिळाल्यावरच काम सुरू होईल.

- भू. शं. सुर्वे, सहायक अभिरक्षक, कोल्हापूर वस्तुसंग्रहालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com