कोल्हापूर : रस्त्यावर थुंकू नका, आरोग्य बिघडवू नका

विद्यार्थी, नागरिकांनी घेतली व्यसनमुक्ती, थुंकीमुक्तीची शपथ
 रस्त्यावर थुंकू नका
रस्त्यावर थुंकू नकाsakal

कोल्हापूर : आरोग्य आणि शिक्षण चांगले असेल तरच यश पदरात पडते, असे छत्रपती शाहू महाराजांचे मत होते. तुमच्या यशामुळे घराचा आणि पर्यायाने देशाचाही विकास घडतो. त्यामुळे स्वतः निर्व्यसनी राहा आणि रस्त्यावर थुंकून समाजाचे आरोग्य बिघवडणार नाही, अशी शपथ घ्या, असे आवाहन प्राचार्य डी. व्ही. पाटील यांनी केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती लोकोत्सवानिमित्त भवानी मंडपात शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी आज ‘व्यसनमुक्ती आणि रस्त्यावर थुंकणार नाही’ अशी शपथ घेतली. यावेळी झालेल्या व्याख्यानात पाटील बोलत होते. यावेळी शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिंनी उपस्थित होत्या.  

प्राचार्य पाटील म्हणाले, छत्रपती शाहू महाराज शंभर वर्षे पुढचे पाहत होते. त्यांनी निर्माण केलेली जिल्ह्यातील २५ वसतिगृहे विद्यार्थ्यांना दाखवावीत. छत्रपती शाहूंच्या जीवनावरील सुमारे ३०० हून अधिक पुस्तके आहेत, प्रत्येक विद्यार्थ्यांने यातील दोन, चार पुस्तके वाचण्याचा संकल्प करावा. यावेळी दीपा शिपूरकर यांनी थुंकी रोगाची प्रसारक आहे, व्यसनाला नाही म्हणण्यातच मर्दुमकी आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकून शहराचे विकृतीकरण करू नका, असे आवाहन केले. शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, व्यंकाप्पा भोसले, ललित गांधी यांची भाषणे झाली. चंद्रकांत यादव, सारिका बकरे, चंद्रकांत सूर्यवंशी, राहुल राजशेखर, रणजित पवार, संभाजीराव जगदाळे, किसन भोसले, विशाल शिराळकर, रमेश मोरे, भाऊ घोडके, सुनीता पाटील, राजेंद्र कुरणे, शीतल नलवडे, अशोक पवार आदी उपस्थित होते.

अशी घेतली शपथ

शेकडो शालेय विद्यार्थी व नागरिकांनी व जुना राजवाड्यात शाहू महाराजांना वंदन करून ‘आरोग्यास घातक असणाऱ्या गुटखा, मावा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणार नाही, सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही. नागरिकांना आरोग्य आणि स्वच्छतेचे धडे पटवून देऊन माझे घर, परिसर, माझी शाहूनगरी, पर्यायाने माझा देश स्वच्छ सुंदर निरोगी बनवण्याचा प्रयत्न करीन’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com