कोल्हापूर : पानगळीचा कालावधी लांबला ; उपनरांतील झाडे अजूनही हिरवीकंच

शहर परिसर, उपनगरातील रस्त्याकडील, बागांमध्‍ये अजूनही झाडे हिरवीकंच दिसत आहेत
leaf Falling
leaf Fallingsakal

कोल्हापूर : पानगळ ही वृक्षांच्या जीवनामधली एक अवस्था आहे. भरपूर पाने असलेल्या वृक्षांची पाने थंडीत गळून जातात. मात्र, अलीकडील काही वर्षात पानगळीचा कालावधी लांबला आहे. ही पानगळ नोव्हेंबरपासून (शिशिर ऋतुत) होते. पण, मार्च ते एप्रिलच्या पहिला आठवड्यानंतर ही पानगळ सुरू झालेली पाहायला मिळते. शहर परिसर, उपनगरातील रस्त्याकडील, बागांमध्‍ये अजूनही झाडे हिरवीकंच दिसत आहेत. डिसेंबरचा उत्तरार्ध, जानेवारी महिना व फेब्रुवारीच्या पूर्वार्धात शिशिर ऋतू असतो. शिशिर ऋतूतच झाडांची पानगळ सुरू होते; पण जिल्ह्यातील अन्‌ पश्‍चिम घाटातील झाडांची पानगळ अजूनही सुरू झालेली नाही.

leaf Falling
कोल्हापूर : कारवाईने उतरवला ‘एलसीबी’चा रुबाब

शास्त्रीय कारणे काय?

शिशिर ऋतू सुरू झाला की, वातावरणातील तापमान कमी होते. वृक्षांची वाढ मंदावते. पानांमधील हरितद्रव्य कमी होते. प्रकाशसंप्रेषण क्रिया मंदावते. हरितद्रव्य कमी झाल्यामुळे पिवळ्या रंगाचे झान्थोफिल्स, नारंगी रंगाचे कॅरेटेनॉइड्स, लाल-जांभळ्या रंगाचे अँथोसायनीन आदी रंगद्रव्ये वाढू लागतात. जेव्हा पानगळ होते, तेव्हा झाडांच्या पानांच्या रंगात बदल दिसतो. हरितद्रव्य कमी होण्याची सुरुवात पानांच्या देठातील पेशींपासून होते. देठातील पेशींच्या थरात सबइरीन, लीगनिन स्त्रवायला सुरुवात होते. या पदार्थांच्या थरामुळे पान फांदीपासून वेगळे होते.यामध्ये वनस्पतीतील ऑक्झीन, इथिलीन, अ‍ॅबसिसिक अ‍ॅसिड ही संप्रेरके तयार होतात. मग पान पिवळेजर्द होऊन खाली पडते.

leaf Falling
अहमदनगर : कर्जत-जामखेडचा चेहरा बदलतोय

परागीभवन महत्त्‍वाचे

काही वनस्पतींना पानगळती झाल्यावर फुले येतात. पानगळ झालेली झाडे पक्षी, कीटक, काही सस्तन प्राण्यांद्वारे परागीभवन होते. पाने नसल्याने फुले सहज दिसतात. पक्षी, कीटक फुलांकडे आकर्षित होतात. फुलांचे परागीकरण होते. यासाठी कोणतेही झाड शिशिर ऋतुत पानांचा भार कमी करते.

पानगळीचा फायदा म्हणजे अन्नद्रव्यांची साठवण, वसंत ऋतूत सुरू होणाऱ्या फुलांचा बहर, फळधारणा हा आहे. पण, परिसरातील झाडांचे निरीक्षण केले तर हा बदल दिसतो. काही वर्षात थंडी नोव्हेंबरपासून सुरू झालेली जाणवत नाही. थंडी नोव्हेंबरपासून सुरू झाली की, ही पानगळ होत असे. पानगळ हे एक गुंतागुंतीचे शास्त्र आहे. तरीही हवामान बदल, प्रत्येक ऋतुतील बदलांचा हा परिणाम आहे, हे निश्‍चित.

-प्रा. डॉ. मकरंद ऐतवडे, वनस्पतीशास्त्रज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com