अकरावी ऑनलाईन प्रवेशाला प्रारंभ

पहिल्या दिवशी ९ अर्ज; कला शाखेला मिळणार ऑफलाईन प्रवेश
Start the 11 online admission kolhapur  Admission for Commerce and Science is online and offline for Arts
Start the 11 online admission kolhapur Admission for Commerce and Science is online and offline for Arts sakal

कोल्हापूर : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला आज प्रारंभ झाला. वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे प्रवेश ऑनलाईन तर कला शाखेसाठी ऑफलाईन प्रवेश दिले जातील, अशी माहिती सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. सुभाष चौगुले म्हणाले, ‘‘या वर्षी ३१ कनिष्ठ महाविद्यालयांमधील १० हजार ९६० जागांसाठी प्रवेश देण्यात येणार आहेत. वाणिज्य आणि विज्ञान शाखांचे प्रवेश ऑनलाईन होतील. www.dydekop.org या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत. विद्यार्थ्यांना भाग - १ आणि भाग - २ अशा दोन फेऱ्यात अर्ज करावा लागणार आहे.

भाग १ मध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. अर्जामध्ये उत्तीर्ण वर्ष, बोर्ड, आसन क्रमांक, मोबाईल, आधार क्रमांक, जन्मतारीख या व अन्य काही बाबींचा समावेश असेल. याच वेळी प्रवेश अर्ज फी भरावी लागेल. भाग २ मध्ये १० वीचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, आरक्षित गटातून प्रवेश घेण्यासाठी जातीचा दाखला ही कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करावी. भाग दोन मध्येच महाविद्यालयांचा पसंती क्रम भरावा लागेल. त्यानंतर फॉर्म सबमीट करायचा आहे. विद्यार्थ्यांनी भाग पहिला भरू ठेवावा. त्यानंतर दुसरा भाग भरण्याबाबत मोबाईलवर मेसेज करून कळवण्यात येईल.

अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी

सीबीएससी तसेच अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांनीही ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा पहिला भाग भरून ठेवावा. गुणपत्रक मिळाल्यावर एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेज येथे गुण समकक्ष करून अर्जाचा भाग - २ भरायचा आहे, असे सुभाष चौगुले यांनी सांगितले.

कला शाखेसाठी थेट प्रवेश

गेल्या वर्षी कला शाखेसाठी उपलब्ध जागांपेक्षा कमी अर्ज आले. त्यामुळे कला शाखेसाठी आता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असणार नाही. त्यांना पूर्वीप्रमाणे महाविद्यालयात जाऊन गुणांच्या प्राधान्यक्रमाने व आरक्षणाच्या शासकीय नियमांचे पालन करून प्रवेश दिले जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com