कोपर्डी तपासावरील आक्षेप फेटाळले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नगर - कोपर्डी अत्याचार व खून खटल्यातील आरोपी संतोष भवाळ याचे वकील ऍड. बाळासाहेब खोपडे यांनी आज तपासी अधिकारी शिवाजी गवारे यांची उलटतपासणी घेतली. भवाळ याच्या अटकेसह तपासातील अनेक बाबींवर त्यांनी आक्षेप घेतले; मात्र तपासी अधिकारी गवारे यांनी सगळे आरोप फेटाळून लावले. आज एका सत्रातच सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी पाच व सहा मे रोजी होणार आहे.

सरकारी पक्षातर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी सुनावणीच्या पहिल्या दिवशी तपासी अधिकारी गवारे यांची सरतपासणी घेतली होती. आरोपी जितेंद्र शिंदे याचे वकील ऍड. योहान मकासरे यांनी काल (मंगळवारी) त्यांची उलटतपासणी घेतली. आरोपी भवाळ याचे वकील ऍड. खोपडे यांनी आज त्यांची उलटतपासणी घेतली. ऍड. खोपडे यांनी तपासातील अनेक बाबींवर आक्षेप घेतला. पोलिसांची आठवडी डायरी अधीक्षक कार्यालयात कधी पाठविता, त्यावर तुम्ही शिक्का मारता का, कर्जतहून कोपर्डीला व कुळधरणला जाताना स्टेशन डायरीत तशी नोंद केली का, आरोपीला अटक केली, की तो स्वत:हून हजर झाला, कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलीला आणल्यानंतर तिच्या अंगावरील कपडे त्याच वेळी जप्त का केले नाहीत व तेथेच पंचनामा का केला नाही, आरोपी भवाळ याच्या घरात सापडलेला मोबाईल जप्त का केला नाही, यासह तपासातील अनेक बाबींवर ऍड. खोपडे यांनी आक्षेप घेतला. गवारे यांनी त्यांचे सगळे आरोप फेटाळून लावले.