कोपर्डी बलात्कार व खून खटला सुनावणी आता 17 मार्चपासून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

नगर - आरोपीचे वकील आजारी असल्याने कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची सुनावणी आजही (शुक्रवारी) झाली नाही. मात्र, "ही शेवटची संधी आहे. पुन्हा वकील गैरहजर राहिले, तरी सुनावणी न थांबवता नियमित सुरू राहील. वकील गैरहजर असतील, तर पर्यायी व्यवस्था करावी,' असा आदेश न्यायालयाने दिला. या खटल्याची सुनावणी आता 17 मार्चपासून नियमित सुरू होणार आहे.

जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. आरोपी संतोष भवाळचे वकील ऍड. बाळासाहेब खोपडे आजारी असल्यामुळे गुरुवारी (ता. 9) सुनावणी झाली नाही. ऍड. खोपडे आजही सुनावणीस हजर नसल्याचे आरोपीकडून सांगण्यात आले, त्यामुळे आजही खटल्याची सुनावणी झाली नाही. आजही वकील गैरहजर असल्याबाबत आरोपीच्या नातेवाइकांकडे न्यायालयाने अर्ज मागितला. अर्ज दिल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी एक आदेश काढला. त्यात म्हटले आहे, "ही शेवटची संधी आहे. पुन्हा वकील गैरहजर राहिले, तरी सुनावणी न थांबवता नियमित सुरू राहील. वकील गैरहजर असतील, तर पर्यायी व्यवस्था करावी.' आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 ते 21 मार्च अशी सलग व नियमित सुरू राहील, असे सांगण्यात आले.

भैलुमेला सरकारी खर्चाने पुस्तके
या खटल्यातील आरोपी नितीन भैलुमेला परीक्षा देण्यास परवानगी व "बी.एस्सी.'ची पुस्तके हवी होती. त्याला पुस्तके देण्याची परवानगी न्यायालयाने यापूर्वीच्या सुनावणीवेळीच दिली होती. मात्र, आरोपीकडे पुस्तके घेण्यासाठी पैसे नसल्याने आता सरकारी खर्चाने पुस्तके देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

Web Title: kopardi rape & murder case result