आरोपी पप्पू शिंदेचा पाठलाग केला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

नगर - 'कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपी जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याला आपण घटनास्थळापासून पळताना पाहिले. त्यानंतर त्याचा पाठलागही केला,'' अशी साक्ष पीडित मुलीच्या चुलतभावाने आज न्यायालयात दिली.

कोपर्डी अत्याचार व खून खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. त्यात काल (मंगळवारी) तीन जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. घटनेचा साक्षीदार आणि फिर्यादी असलेला मुलीचा चुलतभाऊ याची साक्ष आज नोंदविण्यात आली. आरोपी शिंदे याला साक्षीदाराने ओळखले. सरकारपक्षातर्फे राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि आरोपींतर्फे ऍड. बाळासाहेब खोपडे, ऍड. योहान मकासरे, ऍड. प्रकाश आहेर काम पाहत आहेत.

आरोपीच्या वकिलांना घटनास्थळाचा रंगीत नकाशा मिळाला नसल्याने आज सकाळी न्यायालयाचे कामकाज काही वेळ थांबविण्यात आले होते. नकाशा मिळाल्यानंतर कामकाज पुन्हा सुरू झाले. पोलिसांनी पंचनाम्यात जप्त केलेल्या वस्तू आज न्यायालयासमोर दाखविण्यात आल्या. त्यातील सायकल व दुचाकी उद्या (गुरुवारी) सादर करण्यात येणार आहे.