आंदोलनस्थळी शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

कोपरगाव - कोपरगाव-येवला रस्त्यावर खिर्डी गणेश टोल नाक्‍याजवळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना नाटेगाव (ता. कोपरगाव) येथील शेतकरी अशोक शंकर मोरे (वय 45) यांचा अचानक मृत्यू झाला.

कोपरगाव - कोपरगाव-येवला रस्त्यावर खिर्डी गणेश टोल नाक्‍याजवळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना नाटेगाव (ता. कोपरगाव) येथील शेतकरी अशोक शंकर मोरे (वय 45) यांचा अचानक मृत्यू झाला.

हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. आंदोलन सुरू असताना मोरे यांनी जवळच्या टपरीवर चहा घेतला. त्यानंतर काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागले; मात्र कोणाला काही कळण्याच्या आतच ते कोसळले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.