कोयना धरणग्रस्तांच्या पूनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी समिती

सचिन शिंदे 
मंगळवार, 12 जून 2018

कोयना पूनर्वसनाच्या मागण्याबाबत उच्चस्तरीय समिती धोरणात्मक निर्णय देणार आहे. यापूर्वीच जिल्हा पातळीवर टास्क फोर्स तयार केला आला आहे. गुंता होणाऱ्या व वरिष्ठ पातळीवर सोडवण्याजोगे पूनर्वसनाचे प्रश्न उच्चस्तरीय समितीच्या माध्यामातून सोडवण्यात येणार आहेत.

कऱ्हाड : कोयना धरणग्रस्तांच्या पूनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी शासनाने मदत व पूनर्वसन खात्याचे अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अकरा अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती आज नेमण्यात आली.

कोयना पूनर्वसनाच्या मागण्याबाबत उच्चस्तरीय समिती धोरणात्मक निर्णय देणार आहे. यापूर्वीच जिल्हा पातळीवर टास्क फोर्स तयार केला आला आहे. गुंता होणाऱ्या व वरिष्ठ पातळीवर सोडवण्याजोगे पूनर्वसनाचे प्रश्न उच्चस्तरीय समितीच्या माध्यामातून सोडवण्यात येणार आहेत. कोयना धरणग्रस्तांच्या रखडलेल्या ६४ वर्षांच्या पूनर्वसनाबाबत जानेवारीत कोयना धरणग्रस्तांनी महिनाभर ठिय्या आंदोलन केले होते. त्याची दखल त्याचेवळी घेवून कैाही महत्वाचे निर्णय घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धरणग्रस्तांच्या शिष्ट मंडळास दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून त्यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या नेतृत्वखाली टास्क फोर्सची स्थापना झाली होती.

उच्चस्तरीय समितीची नेमणूक बाकी होती. त्या समितीचीही नेमणूक आज झाली. मदत व पूनर्वसनचे अप्पर मुख्य सचिव त्या समितीचे अध्यक्ष आहेत. महसूल व वन विभागातील पूनर्वसनचे उपसचिव समितीचे सचिव आहेत. त्याशिवाय महसूल विभागाचे प्रधान अप्पर मुख्य सचिव, जलसंपदा, वन विभाग, ग्रामविकास, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह पुणे व कोकण विभागीय आयुक्त, पुणे व कोकण विभागाचे पूनर्वसनाचे उपायुक्त समितीचे सदस्य आहेत. त्याशिवाय समितीला अवश्यक असेल्यास अध्यक्षांच्या अनुमतीने संबधित अधिकाऱ्यांचा समितीत समावेश करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. 

Web Title: Koyna Dam affected pepple agitation