कृष्णा पुलाच्या दोन्ही बाजूंना धोका

- पांडुरंग बर्गे
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

सुमारे २० फूट अंतरात संरक्षक कठडे न बसविल्यामुळे अपघाताची शक्‍यता 

सातारा - सातारा-कोरेगाव रस्त्यादरम्यान येथील कृष्णा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला सुमारे २० फूट अंतरात ‘रोड सेफ्टी मेटल बिम क्रॅश बॅरियर’ अर्थात ‘संरक्षक कठडे’ बसवण्यात न आल्याने दोन्ही बाजूने भरधाव आलेले एखादे चारचाकी, दुचाकी वाहन अथवा पादचारी अनावधनाने पुलाखाली  कोसळून गंभीर अपघात होण्याची शक्‍यता आहे.

सुमारे २० फूट अंतरात संरक्षक कठडे न बसविल्यामुळे अपघाताची शक्‍यता 

सातारा - सातारा-कोरेगाव रस्त्यादरम्यान येथील कृष्णा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला सुमारे २० फूट अंतरात ‘रोड सेफ्टी मेटल बिम क्रॅश बॅरियर’ अर्थात ‘संरक्षक कठडे’ बसवण्यात न आल्याने दोन्ही बाजूने भरधाव आलेले एखादे चारचाकी, दुचाकी वाहन अथवा पादचारी अनावधनाने पुलाखाली  कोसळून गंभीर अपघात होण्याची शक्‍यता आहे.

सातारा-पंढरपूर मार्गाने कोरेगाव, पुसेगाव, वडूज, दहिवडी, गोंदवले, म्हसवड, पंढरपूर, सोलापूर अशी मोठी वाहतूक सुरू असते. या मोठ्या शहरांतून पुढे इतरत्र मार्ग फुटतात. या सर्व मार्गावरून एसटी, मालवाहतूक, देवदर्शनासाठी जाणाऱ्यांची वाहतूक लक्षणीय असते. या रस्त्यादरम्यान असलेल्या कृष्णा नदीच्या पुलाच्या सातारा बाजूला संगम माहुलीला जाणाऱ्या रस्त्यापर्यंत एक मोठे वळण असून, वळणाच्या दोन्ही बाजूला सुमारे १०० ते दीडशे फूट खोल दरीवजा खड्डा आहे. जसजसे आपण नदीच्या बाजूला जाऊ, तशी दरीची खोली वाढत जाते. त्यामध्ये झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, रस्त्याकडेला संरक्षक कठडे नसल्यामुळे या खड्डयांत अनेक वाहने कोसळून छोटे-मोठे अपघात होत होते. वाहनचालकांसह प्रवाशांच्या आग्रही मागणीनुसार आणि ‘सकाळ’ने वारंवार आवाज उठवल्यामुळे येथे तसेच पुलाच्या कोरेगाव बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दीड महिन्यापूर्वी ‘रोड सेफ्टी मेटल बिम क्रॅश बॅरियर’ बसवल्यामुळे येथील अपघाताचा धोका टळलेला आहे. त्यामुळे वाहनचालकांसह पादचारी बांधकाम विभागाला धन्यवाद देत आहेत.   

दरम्यान, अशा प्रकारे पुलाच्या दोन्ही बाजूला ‘रोड सेफ्टी मेटल बिम क्रॅश बॅरियर’ बसवले. मात्र, पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूला सुमारे २० फूट अंतरामध्ये हे ‘रोड सेफ्टी मेटल बिम क्रॅश बॅरियर’ बसवलेले नाहीत. 

ते का बसवले नाहीत, हे एक न सुटणारे कोडे आहे. त्यामुळे या सुमारे २० फुटांत कोणत्याही क्षणी एखादे चारचाकी, दुचाकी वाहन अथवा पादचारी अनावधनाने पुलाखाली कोसळून गंभीर अपघात होण्याची शक्‍यता आहे. या अंतरात तातडीने ‘रोड सेफ्टी मेटल बिम क्रॅश बॅरियर’ बसवण्याची मागणी वाहनचालकांसह पादचाऱ्यांतून होत आहे.

कृष्णा पुलाच्या दोन्ही बाजूंना ‘रोड सेफ्टी मेटल बिम क्रॅश बॅरियर’ बसविले. परंतु पुलालगत दोन्ही बाजूंना २० फूट अंतरात ते न बसविल्याने अपघाताचा धोका हा कायम आहे. बांधकाम विभागाने हे काम तातडीने हाती घ्यावे.
- कमलाकर शिंदे, ग्रामस्थ, सोनगाव संमत निंब.

Web Title: krishna bridge danger