‘सकाळ’तर्फे २ जूनपासून ‘लक्ष्य करिअर’ प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

स्टॉल बुकिंग सुरू - एकाच छताखाली शैक्षणिक संस्था

सांगली - दहावी-बारावीची परीक्षा झाली... आता गुणांची यादी हातात येईल...आपली क्षमता कळेल...मग, पुढे काय? भलामोठा प्रश्‍न. कोणते करिअर करायचे त्याचे उत्तर तुम्हाला देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘लक्ष्य करिअर’ प्रदर्शन होणार आहे. ही तुमच्यासाठी जणू खूश खबरच आहे, येत्या २ जूनपासून कल्पद्रुम ग्राऊंड नेमिनाथनगर सांगली येथे प्रदर्शन  भरणार आहे.

स्टॉल बुकिंग सुरू - एकाच छताखाली शैक्षणिक संस्था

सांगली - दहावी-बारावीची परीक्षा झाली... आता गुणांची यादी हातात येईल...आपली क्षमता कळेल...मग, पुढे काय? भलामोठा प्रश्‍न. कोणते करिअर करायचे त्याचे उत्तर तुम्हाला देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘लक्ष्य करिअर’ प्रदर्शन होणार आहे. ही तुमच्यासाठी जणू खूश खबरच आहे, येत्या २ जूनपासून कल्पद्रुम ग्राऊंड नेमिनाथनगर सांगली येथे प्रदर्शन  भरणार आहे.

एकाच छताखाली सांगलीसह कोल्हापूर आणि पुणे-मुंबईतील दर्जेदार शैक्षणिक संस्थांचा सहभाग असेल. मनातल्या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे तिथे मिळतील. मग, तुमच्या करिअरच्या वाटा आणखी सोप्या होतील. त्याचबरोबर तज्ज्ञांचाही  मौलिक सल्ला व्याख्यानाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. 

दरम्यान, स्टॉल बुकिंगला प्रारंभ झाला आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. क्रिएटिव्ह ॲकॅडमी पुणे हे मुख्य प्रायोजक आहेत. तर सांगलीतील सरस्वती आयआयटी ॲकॅडमी व क्‍लीअर कन्सेप्ट ट्युटोरियल्स हे प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. 

करिअरिस्ट विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी काय आहेत, याची सर्वांगीण माहिती या प्रदर्शनात असेल. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर पुढे काय, असा प्रश्‍न बहुतांश विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो. करिअरच्या दृष्टीने कोणत्या संधी उपलब्ध आहेत, नेमके कोणते कौशल्य हवे आणि त्यासाठी नेमके काय शिकायला हवे, या संभ्रमावस्थेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी अशा प्रदर्शनांची परंपरा ‘सकाळ’ने गेल्या काही वर्षांपासून सुरू केली आहे. त्याला प्रत्येक वर्षी भरघोस प्रतिसाद मिळत असून यंदाही हे प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना ‘फॉर राइट चॉइस ऑन राइट टाइम’च ठरणार आहे.

प्रदर्शनाच्या कालावधीत करिअर मार्गदर्शन, शिक्षण संधी याबाबत तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे, समुपदेशन  होणार आहे. अभियांत्रिकीच्या विविध शाखा, मेडिकल, फार्मसी, एमबीए, सॉफ्टवेअर, माहिती तंत्रज्ञान, बॅंकिंग, हॉटेल मॅनेजमेंट, सैन्य दल आदी संस्थांचा समावेश असेल. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांचेही स्टॉल  प्रदर्शनात असतील. त्याशिवाय इतर विविध विद्याशाखांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या दर्जेदार क्‍लासेसचाही प्रदर्शनात समावेश असेल. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बॅंकेचीही सविस्तर माहिती प्रदर्शन उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

आजवर ‘सकाळ’ने घेतलेल्या अशा प्रदर्शनाला हजारो विद्यार्थी आणि पालकांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यंदापासून प्रथमच लहान मुलांच्या इंग्रजी स्कूलचा समावेश केला आहे. एकाच ठिकाणी सर्वाधिक पालक व विद्यार्थ्यांपर्यंत विविध शैक्षणिक संधींचा खजिना खुला करण्यासाठी विविध संस्थांनाही हे प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे. 

स्टॉल बुकिंसाठी संपर्क करा..! 
राहुल कुलकर्णी    (९८२२५३३४५५), 
परितोष भस्मे    (९७६६२१३००३)
संदीप पाटील    (९८८१३३८००८), 
तानाजी जाधव    (९८८११२९२९०)
अजित जाधव    (९८२२०९०८२२)