वेशांतर करून वकिलाने कोपर्डीत केली पाहणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

नगर - 'घटनास्थळाची पाहणी केल्याशिवाय उलटतपासणी घेणार नाही', असे स्पष्ट करणारे कोपर्डी प्रकरणातील आरोपी संतोष भवाळ याचे वकील ऍड. बाळासाहेब खोपडे यांनी पत्रकारांचा वेष करून कोपर्डीत घटनास्थळाची पाहणी केली. तेथे त्यांनी लोकांशी आणि मुलीच्या नातेवाइकांशीही चर्चा केली. ऍड. खोपडे यांनीच पत्रकारांना आज ही माहिती दिली.

कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून केल्याच्या प्रकरणाची सुनावणी विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. मागील सुनावणीच्या वेळी ऍड. खोपडे यांनी 'घटनास्थळाची पाहणी केल्याशिवाय उलटतपासणी घेणार नाही,'' असे स्पष्ट करत घटनास्थळाच्या पाहणीसाठी पोलिसांकडे संरक्षण मागितले होते. मात्र, तेथे प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सुनावणीला ऍड. खोपडे गैरहजर राहिले होते. त्यानंतर त्यांनी कोपर्डी येथील घटनास्थळाची वेषांतर करून पाहणी केली. त्यासाठी ते पत्रकार झाले होते. कॅमेरा घेऊन कोपर्डीत जाऊन घटनास्थळ व परिसराची पाहणी केली. अत्याचार झालेल्या मुलीची आई, आजी व भाऊ, तसेच काही ग्रामस्थांशीही त्यांनी चर्चा केली. बराच काळ कोपर्डीत असताना वेशांतरामुळे कोणाला ओळखू आलो नाही, असे खोपडे यांनी पत्रकारांना सांगितले. "उलटतपासणीच्या दृष्टीने घटनास्थळाची पाहणी करणे गरजेचे होते', असे ऍड. खोपडे म्हणाले.