एलबीटी चुकवणाऱ्यांच्या दारात महापालिकेने जावेच - समीर शहा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 एप्रिल 2017

सांगली - एलबीटी असेसमेंट आणि सीए पॅनेल रद्द करण्यासाठी व्यापारी एकता असोसिएशन व विविध संघटनांनी एकत्रित करून उपोषण केले. त्या वेळी शासनाच्या निर्णयापर्यंत एलबीटी वसूल केला जाणार नाही, असे लेखी आश्‍वासन महापालिकेने दिले होते. मात्र व्यापाऱ्यांना आता पुन्हा त्रास देण्यास सुरवात केली आहे. ज्यांनी आजअखेर कर भरलाच नाही, त्यांच्या दारात जाण्याची हिंमत महापालिकेने दाखवावी, असे आवाहन व्यापारी नेते समीर शहा यांनी केले. 

त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की व्यापारी एकता असोसिएशन, चेंबर ऑफ कॉमर्स व उद्योजक संघटना यांनी एकत्रितपणे आंदोलन छेडले. त्यावेळी खासदार संजय पाटील यांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्यात आला. असेसमेंट व सीए पॅनेल रद्दचा संघटनेचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आला. त्याचा निर्णय होईपर्यंत एलबीटीची कारवाई केली जाणार नाही, अशी लेखी हमी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी दिली होती. खासदारांनीही तशा सूचना दिल्या होत्या. संघटनेचे पदाधिकारीही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. यात ठोस निर्णय होईल, अशी आशा आहे. तत्पूर्वीच पालिकेने व्यापाऱ्यांना पुन्हा नोटिसा पाठवण्यास सुरवात केली आहे. शासनाकडून याबाबतच्या काही सूचना आल्यात का? याचे स्पष्टीकरणही अधिकाऱ्यांकडून दिले जात नाही. स्पष्टीकरण मिळाले नाही, तर पुन्हा व्यापाऱ्यांचे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.