हॉकी स्टेडियमजवळ तरुणास दुचाकी अडवून तिघांनी लुटले

हॉकी स्टेडियमजवळ तरुणास दुचाकी अडवून तिघांनी लुटले

कोल्हापूर - दुचाकी आडवी मारून तिघा अज्ञातांनी तरुणाला मारहाण करत लुटले. हॉकी स्टेडियम परिसरात मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात याची नोंद झाली नाही. गेल्या चार दिवसांपासून शहरात रात्रीच्या वेळी लुटीच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. 

एका प्रतिष्ठित पदावरील एका व्यक्तीचा मुलगा मंगळवारी (ता. २) रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होता. सायबर रोड वळण रस्त्यावरून कळंब्याकडे जात असताना हॉकी स्टेडिअम परिसरात एका दुचाकीवरील तिघांनी त्याला अडवले. ‘दुचाकी नीट चालवता येत नाही का, असा जाब विचारात त्याला दमदाटी व मारहाण सुरू केली. दोघांनी त्याला पकडून त्याच्याकडील पाकीट काढून घेतले. त्यातील रक्कम जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.

या प्रकाराने संबंधित तरुण भांबावून गेला होता. बराच वेळ तो तेथेच बसून होता. पोलिसांना याबाबत समजताच त्यांनी त्याला पोलिस ठाण्यात आणून घडलेल्या प्रकाराबाबत चौकशी केली; मात्र आपली कोणाविरुद्ध काही तक्रार नसल्याचे तरुणाने पोलिसांना लिहून दिले. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी लुटीच्या घटना घडत आहेत. विशेषतः उपनगर व निर्जनस्थळाचा गैरफायदा घेत लुटले जात आहे. दोन दिवसांपूर्वी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिघांनी अशीच लूट केल्याची घटना ताजी असतानाच आज घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com