बारावीत माण तालुक्‍याचा वरचष्मा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

सातारा - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा सातारा जिल्ह्याचा निकाल 91.14 टक्के लागला. माण तालुक्‍याचा सर्वाधिक 93.39 टक्के, तर पाटण तालुक्‍याचा सर्वांत कमी 87.27 टक्के निकाल लागला आहे. 89 कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे. 

या परीक्षेस जिल्ह्यातील 38 हजार 051 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 34 हजार 679 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलींची (95.90 टक्के) उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलांपेक्षा (87.25 टक्के) जादा आहे. यंदा कोल्हापूर विभागाचा निकाल 91 टक्के लागला आहे. या विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वाधिक निकाल 91.50 टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ सांगली जिल्ह्याचा 90.12 टक्के लागला आहे. निकाल पाहण्यासाठी शहरातील सायबर कॅफेमध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी होती. काही जण मोबाईलवर निकाल पाहात होते. महाविद्यालयाच्या बाहेर यशस्वी विद्यार्थी एकमेकांना अलिंगन देऊन शुभेच्छा देत होते. 

शाखानिहाय निकाल 
- विज्ञान- 97.58 टक्के, कला- 79.18 टक्के, वाणिज्य- 95.38 टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम- 90.86 टक्के. 

तालुकानिहाय निकाल 
माण - 93.39, खंडाळा - 93.13, सातारा - 93.34, वाई - 91.92, जावळी - 89.54, कऱ्हाड - 89.83, खटाव - 90.30, कोरेगाव - 90.96, महाबळेश्‍वर - 92.08, फलटण - 90.22, पाटण - 87.27. 

Web Title: Maan taluka tops 93.39 percent in satara HSC result