रवी क्‍लासचे मधुकर डोईफोडे यांचे अपहरण

सुदर्शन हांडे
गुरुवार, 11 मे 2017

येथील रवी क्‍लासेसचे संचालक तथा पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष मधुकर डोईफोडे यांचे सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास शिवशक्ती मैदानाबाहेरून अपहरण झाले आहे.

बार्शी - येथील रवी क्‍लासेसचे संचालक तथा पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष मधुकर डोईफोडे यांचे सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास शिवशक्ती मैदानाबाहेरून अपहरण झाले आहे.

डोईफोडे मॉर्निंग वॉकवरून घरी परतत असताना अपहरणकर्त्यांनी त्यांना जबरदस्तीने क्रमांक नसलेल्या स्कार्पिओ गाडीत घातले. या घटनेमुळे बार्शीकरांमध्ये घबराट पसरली आहे. रवी क्‍लासमुळे घराघरात डोईफोडे पोहोचले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बार्शी पोलिस स्थानकाबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी तपासासाठी पथके रवाना केली आहेत.