महाबळेश्वरचा बंद मागे, व्यवहार पूर्ववत सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

महाबळेश्वर (सातारा)-  वाहनतळाच्या नाव बदलण्याच्या प्रक्रियेवर पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत तोडगा काढला जाईल असे आश्‍वासन प्रांताधिकारी अस्मिता मोरे यांनी बुधवारी (ता.22) रात्री उशिरा दिल्याने नागरिकांनी महाबळेश्‍वर बंदचा निर्णय मागे घेतला. आज (गुरुवारी) व्यावसायिकांनी बाजारपेठ खुली ठेवल्याने व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांनी येथील रे गार्डन वाहनतळास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ असे नामकरण करण्याचे जाहीर केले होते. तसा पालिकेने तेथे फलकही लावला होता. दरम्यान, पालिकेच्या (ता. 21) सर्वसाधारण सभेत हे नाव बदलून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ असे करण्याचा निर्णय घेतला. तसा ठरावही झाला. त्यावर नागरिकांनी व हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली होती. बुधवारी (ता.22) मोर्चा ही काढण्यात आला होता. प्रांताधिकारी अस्मिता मोरे यांनी रात्री उशिरा मुंबईत सुरू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत तोडगा काढला जाईल असे आश्‍वासन दिल्यानंतर नागरिकांनी बंद मागे घेतल्याचे जाहीर केले. आज व्यावसायिकांनी बाजारपेठ खुली ठेवली.

Web Title: mahabaleshwar strike called off