महालक्ष्मीच्या शालूचा पाच लाखांना लिलाव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून खरेदी 
कोल्हापूर - श्री महालक्ष्मी देवीचे महावस्त्र (शालू) आज पाच लाख पाच हजार रुपयांची बोली लावून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक सुभाष येमूल यांनी घेतला. गेल्या वर्षीचा शालू 77 हजार रुपयांची बोली लावून मनीषा खोराटे यांनी घेतला. आजपर्यंतच्या लिलावात ही बोली विक्रमी ठरली. 
 

पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडून खरेदी 
कोल्हापूर - श्री महालक्ष्मी देवीचे महावस्त्र (शालू) आज पाच लाख पाच हजार रुपयांची बोली लावून पुण्यातील बांधकाम व्यावसायिक सुभाष येमूल यांनी घेतला. गेल्या वर्षीचा शालू 77 हजार रुपयांची बोली लावून मनीषा खोराटे यांनी घेतला. आजपर्यंतच्या लिलावात ही बोली विक्रमी ठरली. 
 

आंध्र प्रदेशमधील तिरुमला तिरुपती देवस्थान समितीकडून नवरात्रोत्सवात देवीला शालू पाठविला जातो. नवरात्रोत्सव संपला, की या महावस्त्राचा लिलाव करून तो भक्ताला दिला जातो. शनिवारी दुपारी एक वाजता मंदिरात देवस्थानच्या कार्यालयासमोर मंडप उभारून महावस्त्राचा लिलाव केला. गेल्या वर्षीच्या शालूला योग्य किंमत न आल्याने लिलाव झाला नव्हता. गतवर्षीचा आणि यंदाचा अशा दोन शालूंची लिलाव प्रक्रिया झाली. गेल्या वर्षीच्या शालूच्या लिलावास 75 हजार रुपये सरकारी बोलीपासून सुरवात झाली. मूळच्या आजरा तालुक्‍यातील हालेवाडी येथील व सध्या कोल्हापुरात राहणाऱ्या मनीषा खोराटे यांनी 77 हजार रुपयांची बोली लावली. त्यानंतर कोणीच बोली न लावल्याने त्यांनी तो शालू खरेदी केला. 
 

देवीच्या या वर्षीच्या शालूची सरकारी बोली होती एक लाख रुपये. हा शालू खरेदी करण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. इचलकरंजी येथील राम आडके यांनी एक लाख 11 हजार रुपयांची बोली लावली. त्यानंतर पुण्यातील बांधकाम व्यावसायिक सुभाष येमूल यांच्या वतीने सिद्धेश राणे यांनी एक लाख 21 हजार रुपयांची बोली लावली. त्यानंतर त्या दोघांमध्ये चुरस झाली. विजय फराकटे यांनी लिलावात भाग घेत एक लाख 45 हजारांची बोली लावली. चुरशीमुळे किंमत एक लाख 75 हजारांवर पोचली. त्यानंतर बालकृष्णन यांनी भाग घेत एक लाख 76 हजारांची बोली लावली. त्यानंतर दोन, तीन, चार आणि पाच लाखांचा टप्पा बघता बघता ओलांडला. शेवटी येमूल यांनी पाच लाख पाच हजार रुपयांची बोली लावून शालू खरेदी केला. कोणत्याही परिस्थितीत शालू घ्यायचाच, अशी जिद्द येमूल यांनी ठेवली होती. लिलाव प्रक्रियेवेळी देवस्थान समितीचे सचिव शिवाजी साळवी, सदस्या संगीता खाडे, व्यवस्थापक धनाजी जाधव, विजय पोवार आदी उपस्थित होते.

टॅग्स

पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव :  सर्वसाधारण बैठकीत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही, असे उर्मट उत्तर...

04.42 PM

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणी साठ्यात चोवीस तासांत ०.२१ टीएमसीने वाढ झाली. कोयना धरणाचा पाणी साठा ८८.७५ टीएमसी झाला आहे...

01.54 PM

सांगली - स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रतिक्विंटल वितरण कमिशनमध्ये दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. सध्या प्रतिक्विंटलसाठी...

12.33 PM