शिक्षणसेवकांसाठी सीईटी रद्द

शिक्षणसेवकांसाठी सीईटी रद्द

सांगली - राज्यातील सर्व खासगी अनुदानित शाळांतील शिक्षणसेवकांची भरती आता अभियोग्यता (ऍप्टिट्यूड) आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शिक्षणसेवकांच्या भरतीसाठी होणारी केंद्रीय भरतीपूर्व निवड चाचणी परीक्षा (सीईटी) रद्द करण्यात आली आहे. मात्र स्वयंअर्थसाहाय्यीत शाळा व अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांतील भरतीस ही चाचणी प्रक्रिया लागू राहणार नाही. 

200 गुणांची परीक्षा 
शिक्षणसेवक भरतीसाठी मराठी व इंग्रजी माध्यमातून 200 गुणांची राज्यस्तरीय समान काठिन्यपातळी चाचणी परीक्षा घेतली जाईल. पहिली ते आठवीसाठी शिक्षकपदासाठी महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेल्या; तसेच शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. 

गुणाआधारेच निवड 
या चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खासगी शैक्षणिक संस्थांना गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करावी लागणार आहे. या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत आणि खासगी शैक्षणिक संस्थांना रिक्त पदे आणि आरक्षणविषयक बाबींच्या अंतर्भावासह संबंधित संगणकीय प्रणालीवर किमान 15 दिवसांकरिता प्रसिद्ध करावी लागणार आहे. कोणत्याही वर्षी प्राप्त झालेले चाचणीचे गुण कोणत्याही वर्षाच्या निवड प्रक्रियेसाठी पात्र राहणार आहे. अभियोग्यता चाचणी देण्याची संधी उमेदवारांना पाच वेळा मिळणार आहे. त्यातील जास्तीत जास्त गुणांच्या आधारे संबंधित संस्थेकडे संगणकीय प्रणालीच्या आधारे अर्ज करता येईल. सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील शिक्षणसेवकांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात "पवित्र' या संगणकीय प्रणालीत किमान 15 दिवसांच्या कालावधीसाठी व संस्थांकडून वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होईल. 

संस्थांनी गरजेनुसार पोर्टलवर जाहिरात द्यावी 
वृत्तपत्रांत जाहिरातीची गरज नाही 
ऑनलाइन अर्ज मागवून उमेदवारांची परीक्षा. 
आवश्‍यक उमेदवारांची नियुक्ती करणे संबंधितांना बंधनकारक. 
वर्षांतून दोन वेळा भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com