रस्ते हस्तांतराच्या ठरावावरून सांगलीत महासभा तहकूब

रस्ते हस्तांतराच्या ठरावावरून सांगलीत महासभा तहकूब

सांगली - दारू दुकानांसाठी रस्ते हस्तांतराच्या संभाव्य ठरावावरून महापालिका क्षेत्रात पेटलेले रान शनिवारी तूर्त थंडावले. विषय पत्रिकेवर नसलेल्या विषयावरून रान पेटवून नगरसेवकांची, महापालिकेची बदनामी केल्याबद्दल स्वाभिमानी आघाडी व उपमहापौर गटाचा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने निषेध नोंदवला. महापालिकेवर पायताण मोर्चा काढून ठराविक गटाने लोकनियुक्त नगरसेवकांची नव्हे, तर समस्त नागरिकांची बदनामी केली असून, त्याबद्दल आजची महासभाच 23 मेपर्यंत तहकूब करण्यात आली. धिक्कार, निषेध, घोषणाबाजी, फटाके असा एकूणच आजचा महासभेचा माहोल होता.

सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील दारू दुकाने हटवण्याचे आदेश दिल्यानंतर हा वाद पेटला आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त हस्तांतराची पळवाट शोधली. त्यासाठी महापालिकेकडून ठराव अपेक्षित होता. असा ठराव करावा यासाठी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची खासदार संजय पाटील यांनी भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर खासदारांनी "मी यासाठी नव्हे तर शेरीनाल्याच्या प्रश्‍नासाठी महापालिकेत आलो होतो,' असा खुलासा करताना अशा ठरावाला माझा वैयक्तिक विरोध असल्याचे सांगितले. त्यानंतर हा वाद पेटला, उपमहापौर गट व स्वाभिमानी आघाडीने या विषयावर पथनाट्य, मोर्चे, उपोषण, बैठका या विविध मार्गांनी प्रबोधन सुरू केले. त्यामुळे पडद्याआड होत असलेल्या रस्ते हस्तांतरणाच्या चर्चेला "ब्रेक' लागला. प्रत्येक जण बचावच्या पवित्र्यात गेला. या मुद्यावर आजवर सर्वच नेत्यांनी विरोध केला आहे. असा कोणताही विषय महासभेच्या आजच्या अजेंड्यावर नव्हता मात्र चर्चा सुरू राहिली ती याच मुद्यावर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com