शिवमय वातावरणात महाशिवरात्रीचा सोहळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - भाळी अर्ध चंद्र माती शुभ्र गंध लिंपिले सर्वांगा तुझा भस्म... 

अशा अभंग भक्तिगीतांच्या सुमधूर आळवणीत शहरातील विविध शिवमंदिरांत भाविकांनी शिवदर्शन घेतले. शिवमूर्तीची विविध रूपे, त्यासाठी लावल्या जाणाऱ्या भस्माचे महत्त्व जाणून घेतले. शिव म्हणजे शंकर म्हणजे महादेव एवढ्याच श्रद्धात्मक नामोल्लेखाने भाविक शिवाचे दर्शन घेतात, याच शिवाची प्रांतीय रूपे राज्यात नव्हे, तर देशभर प्रतिष्ठित झाली आहे. त्यांची नावे आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर परिसरातील पूजा साहित्य, धार्मिक पुस्तक रूपातून अनेकांनी जाणून घेतली; तसा महाशिवरात्रीचा सोहळा ज्ञानरूपात संपन्न झाला.

शहरात उत्तरेश्‍वर मंदिर, महालक्ष्मी मंदिरातील अतिबलेश्‍वर मंदिर, कपिलतीर्थ मंदिर, मध्यवर्ती बसस्थानकावरील वटेश्‍वर मंदिर, रावणेश्‍वर मंदिर, कोटीतीर्थ मंदिर येथे महादेव मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. गाभारा प्रवेश होताच भाविकांनी बेलपान, पांढऱ्या फूलमाला महादेवाच्या पिंडीवर वाहिल्या. त्यासोबत मंत्रपठण, आरती सुरू केली. बहुेतक मंदिर परिसरात आरतीची पुस्तके, धार्मिक पुस्तकांचे स्टॉल्स होते.

यात काहींनी महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवपूजेचे व त्याचे धार्मिक माहात्म्यही समजून घेतले. त्याचे सांराश रूप असे की, शिव पूजा विधीत भस्म लिंपणाला महत्त्व आहे. तो भस्म पांढऱ्या रंगाचा नैसर्गिक सुगंध आणि शुभ्रतेची लाभलेली पांढरी राखसदृश मातीचा खडा म्हणजे भस्म, उत्तर भारतात हिमालयीन पायथ्याला तसेच राजस्थानमधील काही भागात मिळणाऱ्या विशिष्ट खडकातून भस्म मिळतो. शरीरातील त्वचा विकार हटविणारा, मनाची प्रसन्नता वाढविणारा शुभ्रतेतून हळूवार भावप्रधान करणाऱ्या भस्माला आयुर्वेदीय महत्त्व आहे. असा भस्म शिवपूजेसाठी वापरला जातो. 

पश्‍चिम महाराष्ट्रात शिव शंकराचा उल्लेख महादेव या नावे जसा होतो, तसाच उल्लेख विविध प्रांतांत नामोल्लेख होतो. यात कोकणात वटेश्‍वर, कपालेश्‍वर, रावणेश्‍वर असे उल्लेख आहेत. उत्तर महाराष्ट्र पर्वतीय रांगा असलेल्या भागात गिरीश्‍वर, त्र्यंबकेश्‍वर, नागेश्‍वर, महाबलेश्‍वर असे उल्लेख आढळतात; मराठवाड्यात विदर्भीय भागात भीमाशंकर, काशी विश्‍वनाथ अशी नावे प्रचलित आहेत. उत्तर भारतात केदारनाथ, ओंकारेश्‍वर, विद्यानाथ जोर्तिलिंग, सोमनाथ मल्लिकार्जुन असे नामोल्लेख कर्नाटक, विशेषतः सीमा भागात आहेत.

शहरातील बहुतेक मंदिरांत पहाटे पूजा अभिषेक सुरू झाला. त्यासोबत भाविकांच्या गर्दीने मंदिराचे आवार फुलून गेले. त्यामुळे उपवासासाठी शाबुदाणा वडे, खिचडी, वरी तांदूळ, शेंगदाणे, फळे, बटाटा चिप्सपासून ते रताळीपर्यंतच्या पदार्थांना मागणी वाढली. वटेश्‍वर, रावणेश्‍वर मंदिरात खास मंडप उभारण्यात आले होते तेथे भाविकांना उन्हापासून बचाव करीत दर्शन रांगेत उभे राहणे शक्‍य झाले. यात सलग तिन दिवस सुट्यांमुळे मोठ्या संख्येने बाहेरगावचे पर्यटक येथे आले आहेत. त्यांनीही स्थानिक मंदिरांत दर्शन घेत विविध हॉटेलमध्ये उपवासाच्या पदार्थाचा अस्वाद घेण्यावर भर दिला. त्यानंतर बहुतेक जण कणेरी मठ, रामलिंग, खिद्रापूर, प्रयाग चिखली अशा शिवमंदिरांकडे तीर्थाटनासाठी रवाना झाले.

Web Title: mahashivratra sohala celebration