महेंद्र अवघडे यांनी शिक्षक संघाला मजबूत केले- सिध्देश्वर पुस्तके

malwadi
malwadi

मलवडी- प्राथमिक शिक्षकांना प्रामाणिकपणे मदत करताना महेंद्र अवघडे यांनी शिक्षक संघाला मजबूत केले. त्यांच्या कार्यामुळेच माणमधील शिक्षकांच्या या उगवत्या नेतृत्वाला शिक्षक बँकेच्या उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली असे प्रतिपादन शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख सिद्धेश्वर पुस्तके यांनी केले.

माण तालुका शिक्षक संघाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी माण पंचायत समिती सभापती रमेश पाटोळे, उपसभापती नितीन राजगे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे व सोनाली पोळ, पंचायत समिती सदस्य विजयकुमार मगर, गट शिक्षणाधिकारी सोनाली विभुते, अॅड.भास्करराव गुंडगे, नगरसेवक सतीश जाधव व अजित पवार, राजकुमार पोळ, सोमनाथ भोसले, शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र घोरपडे, शिवदास खाडे, महेंद्र जानुगडे, मच्छिंद्र मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना सभापती रमेश पाटोळे म्हणाले, महेंद्र अवघडे हे शिक्षकांसाठी धडपडणारे नेतृत्व असून त्यांना मिळालेल्या संधीचे ते नक्कीच सोने करतील. कार्यकर्ता घडण्यास खूप कालावधी जातो. अनेक संघर्षातून तावूनसुलाखून श्री. अवघडे यांच्यासारखा कार्यकर्ता घडतो. त्यांना शिक्षकांनी साथ द्यावी. आपल्या सत्काराला उत्तर देताना महेंद्र अवघडे म्हणाले की हा सत्कार फक्त माझा नसून माझ्या आजपर्यंतच्या वाटचालीत मला मदत करणार्या सर्वांचा आहे. शिक्षकांच्या हितासाठी जे जे करावं लागेल ते करण्यासाठी मी कटिबध्द आहे. यावेळी दादासो मडके, महेश माने सुरेश गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी ज. शा. यादव, सुनिल सावंत, पोपटराव कणसे, रा. बा. लावंड, विक्रम डोंगरे, राजेंद्र बोराटे, पोपट जाधव,  मछिंद्र ढमाळ, विकास देशमुख, मोहनराव जाधव, सुभाष शेटे, बापूराव जगदाळे, सुभाष गोंजारी, सुरज तुपे, हरीश गोरे, महेंद्र कुंभार, राजाराम पिसाळ, किशोर देवकर, हणमंत अवघडे व कार्यकर्ते उपस्थित होते. मोहनराव जाधव यांनी प्रास्ताविक केले तर इंद्रायणी जवळ यांनी सुत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com