नगरमध्ये डॉ. महेश राऊत यांची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

नगर - शहरातील प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. महेश राऊत (वय 41) यांनी आर्थिक विवंचनेतून इंजेक्‍शन घेऊन आत्महत्या केली. फाटके हॉस्पिटलमध्ये रात्री ही घटना घडली असून, आज सकाळी हा प्रकार उघकीस आला. 

फाटके हॉस्पिलटमध्ये आज सकाळी सफाई कर्मचारी साफसफाई करीत असताना त्याला विश्रांती कक्षाचा दरवाजा बंद दिसला. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याला आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडल्यानंतर आत डॉ. राऊत यांचा मृतदेह पडलेला दिसला.

याबाबत तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. यावेळी कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी डॉ. राऊत यांच्या मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली. त्यात घरगुती आणि आर्थिक कारणातून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. डॉ. राऊत फाटके हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयात भूलतज्ञ म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी तपासाकामी हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात अस्कमात मृत्यूची नोंद केली आहे. 

Web Title: Mahesh Raut's commits suicide