दीपकला कैद, एजंट अजून मोकाट

दीपकला कैद, एजंट अजून मोकाट

मंगळवेढा/भोसे - वर्किंग व्हिसा नसल्याच्या कारणाने मलेशियात अटकेत असलेल्या तालुक्‍यातील मानेवाडी येथील दीपक लिंबाजी माने याला सांगलीतील एजंट शिक्षकाच्या चुकीमुळे तीन महिन्यांची कैदेची शिक्षा मलेशिया न्यायालयाने ठोठावली आहे. एजंट मात्र अद्याप मोकाट आहे.

कराड येथे हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रशिक्षणातून मलेशियात नोकरीचे आमिष सांगलीस्थित पोलिसपुत्र शिक्षकाने दाखवले. त्यासाठी दीड लाख रुपये माने कुटुंबीयांकडून घेतले. पण, वर्किंग व्हिसा न देता ट्रॅव्हलिंग व्हिसा देऊन फसविले. मलेशियात अटक करण्यात आली. त्यामुळे दंड व शिक्षा अशी होणारी शिक्षा कमी करण्यात आली. यासाठी भारत सरकारने याबाबतची विनंतीही केली. तीन महिन्यांपैकी एक महिना झाला असून अजून दोन महिने शिक्षा भोगावी लागणार आहे. हे प्रकरण ‘सकाळ’ने लावून धरले. याबाबत परराष्ट्र सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी अधिक लक्ष घातले. शिक्षक एजंटाविरुद्ध सांगलीत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप त्याला अटक करण्यात आली नसून तो मोकाट फिरत आहे. दुसरीकडे मुलाच्या नोकरीतून भविष्य बदलेल, या आशेवर असलेल्या ऊसतोडणीवर उदरनिर्वाह  करणाऱ्या माने कुटुंबीयांची मात्र शिक्षकानेच फसवणूक केल्याने घोर निराशा झाली.

फसवणूक करणाऱ्या एजंटाच्या अटकेअगोदर दीपकला मलेशियातील कोर्टाने शिक्षा सुनावली. हे प्रकरण घडून महिना झाला तरीही पोलिसपुत्र असलेल्या शिक्षक कौस्तुभ पवारला अद्यापही अटक नाही. त्याला अटक न केल्यास उपोषण करणार आहे. 
- शंकर माने, दीपकचे काका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com