सांगलीत युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष निवडीत मंगेश चव्हाण विजयी 

सांगलीत युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष निवडीत मंगेश चव्हाण विजयी 

सांगली - युवक कॉंग्रेस पदाधिकारी निवडीसाठी तीन दिवसाच्या मतदान प्रक्रियेनंतर आज कॉंग्रेस कमिटीमध्ये मतमोजणी झाली. जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक मंगेश चव्हाण विजयी झाले. जिल्हा महासचिवपदी दिनेश सोळगे निवडून आले.

निवडीनंतर कॉंग्रेस कमिटीसमोर फटाक्‍याची आतषबाजी व गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. दरम्यान या निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप विनायक कोळेकर यांनी केला आहे. त्यांनी सांगली विधानसभा मतदारसंघाचा निकाल राखून ठेवावा अशी मागणी केली मात्र ती फेटाळण्यात आली. तथापि त्यांचा तक्रार अर्ज प्रदेश समितीकडे पाठवला जाणार आहे. 

जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मंगेश चव्हाण 3803 मते मिळवून विजयी झाले. तर डॉ. सुशिल गोतपागर - 241, संदीप जाधव- 1605, शोभा खांडेकर-247, वैभव पवार-1115 अशी मते मिळाली. जिल्हा महासचिवपदाच्या निवडणुकीत दिनेश सोळगे 1802 मते मिळवून विजयी झाले. तर जहीरअहमद मुजावर-664, निशा पाटील-380, रमेश कोळेकर-214, सुकेश पाटील-560, ऍड. सचिन पाटील-1091, सुधीर जाधव-1407, सुजित लकडे- 213, सुमित गायकवाड- 657 मते मिळाली. 

विधानसभा मतदार संघ निवडणुकीचा निकाल असा : मिरज- संभाजी पाटील (325 मते), इस्लामपूर- राजू वलांडकर (148), जत- विकास माने (49), खानापूर- जयदीप भोसले (307), पलूस- प्रमोद जाधव (804), शिराळा- प्रताप घाटगे (68), तासगाव- महेशकुमार पाटील (320), सांगली- योगेश राणे (201). 

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भगवती प्रसाद यांनी काम पाहिले. आज सकाळी कॉंग्रेस कमिटीमध्ये मतमोजणी झाल्यानंतर त्यानी निकाल जाहीर झाला. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्‍यांची आतषबाजी व गुलाल उधळून जल्लोष केला. 

सांगलीत बोगत मतदानाची तक्रार- 
सांगली विधानसभा मतदारसंघाचा निकाल घोषित करू नये यासाठी उमेदवार विनायक कोळेकर यांनी आक्षेप घेतला. मतदार संघाबाहेरील मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यांना येथे आणून मतदान करून घेतले गेले. सांगलीत मतदानासाठी तीन टॅब असताना चार टॅब मशिन असल्याचा मेसेज उमेदवारांच्या मोबाईलवर आला आहे. त्यामुळे बोगस मतदान झाले असून निकाल राखून ठेवावा अशी मागणी श्री. कोळेकर यांनी केली. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी भगवती प्रसाद यांना तक्रार दिली. 

तक्रार प्रदेशकडे - 
श्री. भगवती प्रसाद म्हणाले, सांगलीतील मतदानाबाबत जी तक्रार प्राप्त झाली आहे, ती उशिरा प्राप्त झाली आहे. तरी देखील आम्ही तक्रार अर्ज घेतला आहे. तो प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवला जाईल. त्यावर निर्णय तेथूनच घेतला जाईल. 

दादा गटावर अन्याय - 
युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीत आमदार विश्‍वजीत कदम गटाचे वर्चस्व दिसून आले. सांगलीतील निकालानंतर तक्रार केल्यानंतर उमेदवार विनायक कोळेकर यांनी हा दादा गटावर अन्याय असल्याची प्रतिक्रिया दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com