सकल मराठा समाजाने दिला फराळाचा आस्वाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - मराठा क्रांती मोर्चानंतर परस्परातील एकोपा कायम राहावा, सकल मराठा समाजाच्या मावळ्यांनी आज पुढाकार घेतला. सर्व समाजबांधवांनी एकत्रित करून दिवाळीच्या पूर्वसंध्येला फराळाचा आस्वाद दिला.

कोल्हापूर - मराठा क्रांती मोर्चानंतर परस्परातील एकोपा कायम राहावा, सकल मराठा समाजाच्या मावळ्यांनी आज पुढाकार घेतला. सर्व समाजबांधवांनी एकत्रित करून दिवाळीच्या पूर्वसंध्येला फराळाचा आस्वाद दिला.

मराठा क्रांती मूक मोर्चानंतर सर्वच समाजातील लोक एकत्रित आले आहेत. शेतीमालाला हमीभाव, कोपर्डी घटनेतील आरोपींनी फाशी, आरक्षण या मुद्द्यावर अठरापगड जातीच्या लोकांनी मराठा समाजाला पाठिंबा दिला. सामूहिक प्रयत्नातून मोर्चा यशस्वी झाला. केवळ मोर्चापुरती एकजूट न राहता हे सौख्य कायम राहावे यासाठी दिवाळीचा मुहूर्त साधण्यात आला. राजारामपुरीतील दीडशे तरुण मावळ्यांनी घरोघरी फराळ एकत्रित केला. प्रत्येक समाजबांधव सामूहिक फराळात सहभागी व्हावा यासाठी पंधरा दिवसांपासून मावळे राबत आहेत. आज सायंकाळी लकी बझारसमोरील भैया घोरपडे सभागृहात स्नेहमेळावा रंगला. कुणी लाडू तर कुणी अन्य फराळ घेण्यासाठी परस्परास आग्रह करत होते. मोर्चावेळी मावळ्यांनी पिवळ्या रंगाचे टी शर्ट परिधान केले होते, ते टी शर्ट आजही होते.
सुमारे तासभर गप्पांचा कार्यक्रम रंगला. परस्परांना दिवाळीच्या शुभेच्छा देत रात्री समारोप झाला. मावळा ग्रुपच्या मावळ्यांनी कार्यक्रम आयोजिला. ऋतुराज माने, प्रतीक काटकर, अवधूत पाटील, ऋतुराज जगताप, सुजय उलपे, सारंग नलवडे, कौस्तुभ मुळीक, अक्षय ढेरे, पुलकिता भोसले, श्रृतिका शिंदे, शिवानी पोवार, प्रार्थना पवार, श्रद्धा राऊत. धनराज माने, ऋतुजा काटकर, स्नेहाजंली काटकर यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Maratha community gives diwali food