ना धर्मासाठी, जातीसाठी; आम्ही आलो लेकींसाठी

सम्राट फडणीस : सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 ऑक्टोबर 2016

मी मोर्चासाठी येथे आला आहे. कोणत्याही मुलीवर अत्याचार होऊ नये असेच मला वाटते. 

कोल्हापूर - ना धर्मासाठी, ना जातीसाठी आम्ही आलो आहे आमच्या लेकींसाठी, असे म्हणत कागल तालुक्यातून पोलिसग्रस्त संजय रानगे कोल्हापुरात आज (शनिवार) होत असलेल्या मराठी क्रांती मूक मोर्चात पोहचला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी घटनेतील दोषींना फाशी द्यावी यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे होत आहेत. आज (शनिवार) कोल्हापुरात मोर्चा होत असून हा मोर्चा "न भूतो न भविष्यति‘ असा असा होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासह सातारा, सांगली, बेळगाव आणि मराठवाड्यातून नागरिक लाखोंच्या संख्येने सहभागी झाले आहेत. अवघे शहर भगवामय झाले असून, शहरातील सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.

या गर्दीत कागल तालुक्यातील मंगनूर गावचा 27 वर्षीय संजय रानगेही पोहचला आहे. पोलिसग्रस्त असूनही दुधाच्या टँकरमधून प्रवास करत तो मोर्चात सहभागी झाला आहे. तो म्हणाला, की मी मोर्चासाठी येथे आला आहे. कोणत्याही मुलीवर अत्याचार होऊ नये असेच मला वाटते.