साताऱ्यात लाखोंचा नि:शब्द ‘एल्गार’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

सातारा - मराठा क्रांती मोर्चाचे वादळ सातारा जिल्ह्यातील कानाकोपऱ्यांत, दऱ्याखोऱ्यांत महिनाभर घुमले. शंभू महादेव, महागणपती, यमाई देवीचे आशीर्वाद, कऱ्हाडच्या प्रीतिसंगमाचे पावित्र्य, महाबळेश्‍वर-पाचगणीचा गारवा घेऊन प्रतापगडाचा पराक्रम स्मरत अजिंक्‍यताऱ्याच्या साक्षीने इतिहास घडविण्यासाठी जिल्हाभर घुमलेले मराठा क्रांतीचे तुफान आज सातारा राजधानीत येऊन धडकले. मराठ्यांचा ‘राजधानी’तील ‘मूक’ हुंकार सरकारच्या कानी धडकण्यासाठी तब्बल ३० ते ३५ लाख मराठा समाजाने क्रांतीचा नि:शब्द एल्गार केला. 

जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात ‘एक मराठा, लाख मराठा’ हा एकच नाद घुमत होता. आज मराठ्यांचे जथेच्या जथे साताऱ्यात उतरले. प्रत्येकाच्या हातात भगवा झेंडा होता. रस्त्यांवर उतरलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मराठी अस्मितेचे तेज झळाळत होते.  पोवई नाका येथील मुख्य ठिकाणी एका युवतीने निवेदन वाचन केले. त्यात मराठा समाजाला आरक्षण, ॲट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करणे, कोपर्डी प्रकरणातील गुन्हेगारांना फाशी देणे, शेतीमालाला हमी भाव देण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, मराठा समाजातील मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक तत्काळ पूर्ण करावे यांसह २० मागण्या मोर्चेकऱ्यांना वाचून दाखविल्या. त्यानंतर एका युवतीने मनोगत व्यक्‍त केले. 

दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी मोर्चात सहभागी झाले होते.

Web Title: maratha kranti morcha in satara