सोशल साईटही "मराठामय' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

सांगली - मराठा क्रांती मोर्चासाठी लाखोंचा जनसमुदाय सांगली शहरात लोटला होता. सकाळी सातपासून गर्दीचे लोंढेच्या लोंढे येत होते. मोर्चेकर एकत्रित येण्यापासून सहभागी होण्यापर्यंतचे सारे अपटेड फेसबुक, व्हॉटस्‌ऍप, ट्विटर आणि "ई-सकाळ' सारख्या सोशल साईटवर अपलोड केले जात होते. जगभरातील नेटिझन्स्‌नी प्रतिक्रिया व्यक्त करीत मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, असे ठणकावून सांगण्यात आले. 

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी, हक्कासाठी "मराठा क्रांती मोर्चा'चा राज्यभर एल्गार सुरू आहे. त्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला. लाखोंच्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर उतरून "निःशब्द मनाचा हुंकार' दाखवला गेला. टेक्‍नोसॅव्ही युगात फेसबुक, व्हॉटस्‌, ट्विटर सारख्या माध्यमातून तरुणाईला "कॅच' केले गेले. मध्यरात्रीपासून "एक मराठा..लाख मराठा' ची पोस्ट अगदी प्रखरपणे झळकली. पहाटेपासून चाललेली लगबग क्षणाला अपटेड केली जात होती. उसळलेला जनसमुदायाचा भव्य फोटो शेकडो पोस्ट सकाळपासून "व्हायरल' झाल्या होत्या. फेसबुक, व्हॉटस्‌ऍप, ट्विटरसारख्या सोशल मीडियावरही "क्रांती'ची मोहोर उमटली. 

मोर्चासाठी नव्या साईटस्‌, फेसबुक पेज तयार केले होते. शेकडोंच्या संख्येने व्हॉटस्‌ऍपवर ग्रुप्स्‌ तयार करण्यात आले. "मराठा क्रांती मूक मोर्चा' चा लोगो "डीपी' ला लावून लाखो तरुण-तरुणींनी मोर्चाला पाठिंबा जाहीर केला. त्यात मीडियाद्वारे सहभागसुद्धा नोंदवला. मराठा समाजाच्या समस्या, इतिहास, प्रलंबित प्रश्‍न अन्‌ मागण्यांबाबत केलेल्या अनेक लेख, कविता शेअर केल्या जात होत्या. हजारोंच्या संख्येने लाइक्‍स मिळत होत्या.

विशेषतः महाविद्यालयीन तरुणांनी अशा पोस्ट शेअर केल्या. काहींनी फेसबुकच्या टाइम लाइनवर विशाल जनसागराचा फोटो लावला होता. गेल्या काही दिवसांत जणू फेसबुकच्या भिंती भगवेमय झाल्यात. आज सकाळी जनसागराचे फोटो शेअर केले गेले. सेल्फी काढू नये, अशी आचारसंहिता असली तरी अनेकांनी सेल्फी काढून शेअर केले. दिवसभर एकच चर्चा सुरू राहिली. रात्री उशिराला सर्व व्हॉटस्‌ ग्रुपवर मोठ्या संख्येने सहभागी झालात, याचे आभारही मानण्यात आले.