मराठा आरक्षणाबरोबरच सीमाप्रश्नही सोडवा

MarathaKrantiMorcha rally at shinoli taluka chandgad
MarathaKrantiMorcha rally at shinoli taluka chandgad

शिनोळी ता. चंदगड - मराठा समाजाला आरक्षण देण्याबरोबरच सिमाप्रश्नाची सोडवणूक करावी या मागणीसाठी सकल मराठा समाज बेळगावतर्फे रविवारी शिनोळी येथे रास्ता करण्यात आला असून यामध्ये बेळगावसह चंदगड तालुक्यातील हजारो मराठा बांधव सहभागी झाले आहेत. एक मराठा लाख मराठा, बेळगाव कारवार निपानी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आदी घोषणा देऊन यावेळी परिसर दणाणून सोडला. 

रविवार असल्यामुळे अंबोली व इतर ठिकाणी जाणाऱ्या लोंकाच्या वाहनांच्या रांगा दोन्ही बाजूला लागल्या तसेच वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. धर्मवीर संभाजी चौकातील संभाजी राजांना अभिवादन करुन कार्यकर्ते शिनोळी येथे दाखल झाले. रास्ता रोको आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिनोळी बंद ठेवण्यात आली होती. माजी आमदार मनोहर किनेकर, सकल मराठा समाजाचे प्रकाश मरगाले, गुनवंत पाटिल, कोल्हापुर शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवने, बेळगाव शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर यांच्यासह हजोरो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com